Join us  

कॉफी आणि बेकिंग सोडा, २ उपाय- घरातल्या टॉयलेटमधली दुर्गंधी होईल गायब-राहील स्वच्छ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 5:49 PM

How to Make Your Toilet Smell Nice : घरातल्या टॉयलेट-बाथरुममधून दुर्गंधी येणं हे काही बरं नव्हे, हायजिनसाठी आवश्यक २ उपाय

अनोळख्या ठिकाणी किंवा पाहुण्यांकडे गेल्यावर आपण टॉयलेटमध्ये जाण्यास टाळतो. कारण बऱ्याचदा टॉयलेट क्लिन (Toilet Cleaning Tips) असेल नसेल याची कल्पना आपल्याला नसते. टॉयलेट जरी क्लिन असले, तरी त्यातून येणारी दुर्गंधी फारच असह्य होते. काही वेळेला ही दुर्गंधी नाकात जाऊन बसते. दिवसभर नाकातून ही दुर्गंधी निघत नाही. ज्यामुळे आपण खाणं-पिणं ही टाळतो. पण अधिक काळ टॉयलेटमध्ये न जाणं ही योग्य नाही. यामुळे किडनीच्या निगडीत समस्या वाढतात.

बऱ्याचदा घरातले टॉयलेटही क्लिन नसते, त्यातून दुर्गंधी येऊ लागते. ज्यामुळे पाहुणे आलेत की, त्यांच्यासमोर लाजिरवाणे वाटते. बाथरूममधून दुर्गंधी येऊ नये, म्हणून आपण फ्रेशनर आणून ठेवतो. फ्रेशनरचा सुगंध फार काळ टिकत नाही. जर आपल्याला टॉयलेट दुर्गंधीमुक्त करायचं असेल तर, काही घरगुती गोष्टींचा वापर करून पाहा. यामुळे काही मिनिटात टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी कमी होईल(How to Make Your Toilet Smell Nice).

टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून उपाय

एक्झॉस्ट फॅन

टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ नये म्हणून, तिथे लहान एक्झॉस्ट फॅन बसवणे खूप गरजेचं आहे. टॉयलेट सीटवर बसण्यापूर्वी ते चालू करणे आवश्यक आहे. एक्झॉस्ट फॅनमुळे दुर्गंधी बाहेर फेकली जाईल. ज्यामुळे टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी कमी होईल.

एड्स डे निमित्त फॅशन डिझायनरचा अनोखा प्रयोग, एक्स्पायर्ड कंडोमपासून तयार केला ड्रेस; नेटकरी म्हणाले..

बेकिंग सोडा

टॉयलेटचा वापर केल्यानंतर प्रचंड दुर्गंधी पसरते. अशावेळी आपण बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. बेकिंग सोडा टॉयलेटच्या टाकीमध्ये घालून ठेवा. जेणेकरुन जेव्हाही तुम्ही फ्लश कराल, तेव्हा ते पाण्यात येईल आणि दुर्गंधी सहज दूर होण्यास मदत होईल. आपण बेकिंग सोड्यासोबत व्हिनेगर देखील घालू शकता.

किचन सिंक तुंबते? घरभर दुर्गंधी? चमचाभर बेकिंग सोड्याचे ३ उपाय, सिंक तुंबणार नाही

कॉफी

आपल्याला टॉयलेट फ्रेश आणि सुगंधित ठेवायचं असेल तर, कॉफीचा नक्कीच वापर करून पाहा. यासाठी एका भांड्यात दोन चमचे कॉफी घ्या आणि त्यात गरम पाणी घाला, कॉफीची वाटी रात्री टॉयलेट टेबलवर ठेवा.  त्याच्या स्ट्रँाग सुगंधामुळे टॉयलेटची खोली दुर्गंधीमुक्त होईल.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया