आपल्या आवडत्या व्यक्तीशी लग्न करण्यासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. लग्नात ऐनवेळी प्रियकराची एंट्री झाल्यानंतर काय काय होऊ शकतं हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. अशाच एका गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका बंगाली मालिकेतील हा सीन असल्याचं सांगितलं जात आहे. हा शो सोहोचोरी आणि बोर्फी या दोघांमधील मैत्रीबद्दल आहे. (How To Marry Your Crush)
या मालिकेत कौटुंबिक आणि सामाजिक अडथळे देखील दाखवण्यात आले आहेत. ट्विटर पेज "Rofl_Baba" द्वारे अपलोड केलेल्या कॅप्शनमध्ये असे म्हटले आहे की. 'व्हिडिओमध्ये एखादी व्यक्ती आपल्या क्रशशी लग्न कसे करू शकते हे पटवून देतो.' (How to marry your crush this bengali daily soap has a bizarre trick nobody should try)
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक लग्नात वरमाला घालण्याचा कार्यक्रम सुरू असताना एक मुलगा तिथे येतो आणि नवऱ्या मुलाला बाजूला करून मुलीच्या गळ्यात हार घालतो. तो एव्हढ्यावरच थांबत नाही तर तिच्या कपाळावर सिंदूरही लावतो. हे खूप विनोदी वाटत असले तरी मालिकेत क्रिएट केलेला सीन उत्सुकता ताणून धरतो.
How to marry ur crush 😍 pic.twitter.com/qlu4K9OuNV
— Rofl_Baba (@aflatoon391) May 18, 2022
व्हायरल झालेल्या व्हिडिओने नेटिझन्सचे बरेच लक्ष वेधून घेतले आहे. अपलोड केल्यापासून, त्याला 67.4K पेक्षा जास्त व्हिव्हज या व्हिडिओला मिळाले आहेत. एका व्यक्तीने टिप्पणी विभागात लिहिले, पंजाबी लग्नात हे करून पाहा.'' दुसर्या व्यक्तीने लिहिले, ''हा व्हिडिओ मला कुमकुम/सिंदूर वापरण्याच्या फायद्यांबद्दलच्या ट्विटची आठवण करून देते. नेटिझन्स प्रतिक्रिया म्हणून विनोदी मीम्स शेअर करताना देखील पाहिले जाऊ शकतात. अनेकजण या व्हिडिओवर टिकांचा भडीमार करत आहेत.''