Join us  

पावसाळ्यात डास आणि चिलटांचा घरभर उच्छाद? फरशी पुसताना पाण्यात घाला ४ गोष्टी; वैतागच संपेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2024 7:48 PM

How to Mop Every Type of Floor the Right Way - 3 Tips : पाण्यात घाला स्वस्तात मस्त ४ गोष्टी; फरशी आरशासारखी चमकेल

फरशी स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसातून २ वेळा लादी पुसावी लागते (Cleaning Tips). जर घरात लहान मुलं असतील तर दिवसातून २ ते ३ वेळा लादी पुसणे होतेच. लोक फरशी स्वच्छ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांचा किंवा लादी पुसण्याच्या डस्टरचा वापर करतात. पण तरीही लादी चकचकीत दिसत नाही. त्यावर डाग तसेच राहतात.

ज्यामुळे घरात माश्या, किडे आणि डास येतात. ज्यामुळे घरात रोगराई पसरते. फरशी अधिक चिकट आणि घरात डास आणि चिलटं झाल्यास फरशी पुसत असलेल्या पाण्यात ३ गोष्टी घाला. फरशी चमकेल आणि घरात  डास आणि चिलटंही येणार नाहीत(How to Mop Every Type of Floor the Right Way - 3 Tips).

फरशी पुसताना पाण्यात कोणत्या गोष्टी घालाव्यात?

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापर फक्त जेवणासाठी नसून, फरशी पुसण्यासाठीही आपण करू शकता. व्हिनेगर जमिनीवरील घाण काढून टाकते. ज्यामुळे घरात डास आणि चिलटं  येणार नाहीत. यासाठी लादी पुसण्याच्या पाण्यात एक लहान कप व्हिनेगर घाला. याने लादी पुसून घ्या.

डाळ शिजतानाच मीठ घालावं की नंतर? पोषण भरपूर मिळायचे तर पाहा डाळ शिजवण्याची योग्य पद्धत

कडुलिंबाच्या पानांचा वापर

कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे कीटक दूर राहतात. यासाठी काही कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर पाणी लादी पुसण्याच्या पाण्यात मिसळा. या पाण्यामुळे फरशीवरील घाण निघेल आणि घरात डास आणि चिलटंही येणार नाही.

मीठ

मिठामुळे पदार्थाची चव वाढते. आपण याच्या वापराने फरशी देखील स्वच्छ करू शकता. यासाठी एका बादलीमध्ये पाणी घ्या, त्यात मीठ घालून मिक्स करा. व या पाण्याने फरशी स्वच्छ करा. मिठाच्या पाण्यानेही फरशी स्वच्छ होऊ शकते.

१ चमचा तुपात कालवून खा ३ गोष्टी; दृष्टी होईल तेज - डोळ्यांचे विकार राहतील दूर

लिंबू आणि बेकिंग सोडा

लिंबू आणि बेकिंग सोड्यामुळे फरशी चमकते. शिवाय घरात डासही येत नाही. एका बादली पाण्यात एक लिंबाचा रस आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळा. नंतर फरशी स्वच्छ करा.  लिंबाचा सुगंध आणि बेकिंग सोड्यातील घटक कीटकांना दूर ठेवण्यास मदत करते. 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरल