Lokmat Sakhi >Social Viral > फरशीची चमक हरवली? लादी पुसण्याच्या पाण्यात घाला ४ गोष्टी; फरशी चमकेल - घर प्रसन्न राहील..

फरशीची चमक हरवली? लादी पुसण्याच्या पाण्यात घाला ४ गोष्टी; फरशी चमकेल - घर प्रसन्न राहील..

How to mop the floor to make it shiny and fragrant : फरशीवरील बॅक्टेरिया - घाण काढण्यासाठी पाण्यात ४ गोष्टी घाला..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 04:55 PM2024-08-12T16:55:42+5:302024-08-12T16:57:00+5:30

How to mop the floor to make it shiny and fragrant : फरशीवरील बॅक्टेरिया - घाण काढण्यासाठी पाण्यात ४ गोष्टी घाला..

How to mop the floor to make it shiny and fragrant | फरशीची चमक हरवली? लादी पुसण्याच्या पाण्यात घाला ४ गोष्टी; फरशी चमकेल - घर प्रसन्न राहील..

फरशीची चमक हरवली? लादी पुसण्याच्या पाण्यात घाला ४ गोष्टी; फरशी चमकेल - घर प्रसन्न राहील..

घराची साफ सफाई करताना आपण फरशी देखील दररोज स्वच्छ करतो (Cleaning Tips). आजकाल अनेकांच्या घरात पांढरी फरशी असते. जी लवकर खराब दिसते. एका डागामुळेही फरशी घाण दिसू शकते (Mopping). फरशी नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण फरशीवर न दिसणारे किटाणू असतात. फरशीवर आपण उठतो, बसतो आणि चालतो.

त्यावर पडलेलं अन्न लहान मुलं खातं. ज्यामुळे पोटात अन्नासोबत किटाणूही जातात. ज्यामुळे मुल आजारी पडण्याची शक्यता असते. अशावेळी दिवसातून २ वेळा फरशी साफ करणं गरजेचं आहे. कोपऱ्यांमधली घाण आणि किटाणू स्वच्छ करण्यासाठी पाण्यात ४ गोष्टी मिसळा. यामुळे फरशी स्वच्छ होईल. शिवाय फरशी नव्यासारखी चमकेल(How to mop the floor to make it shiny and fragrant).

फरशी पुसताना पाण्यात कोणत्या गोष्टी मिसळावे?

लिंबूवर्गीय फळे

लिंबू किंवा संत्र्याचा रस मॉपिंग वॉटरमध्ये आपण घालू शकता. यामुळे फरशी केवळ चमकत नाही. तर फरशी पुसल्यानंतर घर फ्रेश दिसेल. शिवाय घरात प्रसन्न वातावरण राहील. लिंबाच्या ऍसिडमुळे फरशीवरील घाण आणि डाग काढून टाकण्यास मदत होईल. संत्रीच्या रसामुळे फरशी चमकेल.

ओट्याजवळ उभं राहूनही दूध उतू जातंच? ४ जबरदस्त टिप्स; लक्ष दिलं नाही तरी दूध उतू जाणार नाही..

व्हिनेगर

व्हिनेगरच्या वापरानेही आपण फरशी क्लिन करू शकता. यासाठी बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात अर्धा कप व्हिनेगर घालून मिक्स करा. या पाण्याने फरशी पुसून घ्या. या पाण्याने फरशी पुसल्याने फरशीवरील घाण आणि बॅक्टेरिया निघून जाईल. यामुळे आपल्याला फ्रेश वाटेल.

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा फक्त पदार्थात वापरण्यासाठी नसून, फरशी स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. यासाठी एक बादली पाण्यात एक चमचा बेकिंग सोडा घालून मिक्स करा. बेकिंग सोडामधील अँटी-मायक्रोबियल गुणधर्म फरशी स्वच्छ ठेवतात. शिवाय घर प्रसन्न राहते.

Web Title: How to mop the floor to make it shiny and fragrant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.