Lokmat Sakhi >Social Viral > नारळ फोडले की खोबरे काढणे अवघड होते? ही घ्या सोपी ट्रिक, खोबरे झटपट हातात..

नारळ फोडले की खोबरे काढणे अवघड होते? ही घ्या सोपी ट्रिक, खोबरे झटपट हातात..

Separation of Coconut From The Hard Shell: नारळ फोडल्यावर खोबरं खाण्यासाठी आता नारळाची करवंटी हातात धरून आदळ- आपट करण्याची काहीच गरज नाही. ही सोपी युक्ती (simple tricks and tips) वापरा. खोबरं झटपट मोकळं होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2022 05:59 PM2022-07-22T17:59:36+5:302022-07-22T18:00:18+5:30

Separation of Coconut From The Hard Shell: नारळ फोडल्यावर खोबरं खाण्यासाठी आता नारळाची करवंटी हातात धरून आदळ- आपट करण्याची काहीच गरज नाही. ही सोपी युक्ती (simple tricks and tips) वापरा. खोबरं झटपट मोकळं होईल.

How to open coconut without any tools, How to separate coconut from the shell? | नारळ फोडले की खोबरे काढणे अवघड होते? ही घ्या सोपी ट्रिक, खोबरे झटपट हातात..

नारळ फोडले की खोबरे काढणे अवघड होते? ही घ्या सोपी ट्रिक, खोबरे झटपट हातात..

Highlightsतुम्हाला जर ही ट्रिक सोपी वाटत असेल आणि आवडली असेल, तर करून बघायला काहीच हरकत नाही. 

देवासमोर फोडण्यासाठी किंवा एखाद्या पुजेसाठी नेहमीच नारळ (coconut) लागतो आणि तो फोडल्या जातो. पण खरं तर तिथून पुढेच महत्त्वाचं काम सुरू होतं. नारळातलं पांढरे शुभ्र, गोड, रसरशीत खोबरे खायला सगळ्यांनाच आवडते. पण करवंटीला ते असे काही घट्ट चिकटलेले असते, की त्यातून ते विलग (How to seperate coconut from the shell) करण्यासाठी खूपच कसरत करावी लागते. एवढी कसरत पाहूनच मग ते खोबरे खाण्याचा मूड निघून जातो. अशीच पंचाईत आणखी एकदा होते, जेव्हा नारळाची बर्फी किंवा तसेच काही इतर पदार्थ करण्यासाठी आपण नारळ आणतो. तो पदार्थ करण्यापेक्षाही करवंटीतून खाेबरं वेगळं करणं कठीण वाटू लागतं. म्हणूनच तर ही बघा एक स्पेशल ट्रिक.(tricks and tips for breaking coconut)

 

नारळातून खोबरं वेगळं कसं करायचं, याविषयीचा एक खास व्हिडिओ इन्स्टाग्रामच्या tspices_kitchen या पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्यांनी असं दाखवलं आहे सगळ्यात आधी गॅसवर एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्या पाण्यात फोडलेला नारळ टाका. एखादा मिनिट गरम पाण्यात नारळ ठेवा आणि त्यानंतर बाहेर काढा. बाहेर काढल्यानंतर चमच्याने अलगद नारळातून खोबरं वेगळं होईल. त्यासाठी कोणतीही टोकदार वस्तू वापरण्याची गरज राहणार नाही.

 

हा व्हिडिओ अनेक जणांना आवडला असून ही ट्रिक ट्राय करणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर काही जणांच्या मते हा व्हिडिओ तेवढासा उपयुक्त नाही. एकतर नारळ उकळत्या पाण्यात टाकणार त्यामुळे खोबऱ्याचे पौष्टिक गुण पाण्यात जाणार. मग हे पाणी वापरायचं कसं हा आणखी एक प्रश्न. शिवाय उकळत्या पाण्यात भिजलेलं नारळ काढल्यानंतर मऊ पडलेलं असणार.

स्वतःला द्या शाही ट्रिट, करा ड्रायफ्रूट स्मूदी! पोटभर-पौष्टिक आणि चविष्ट, तबियत खुश 

त्यामुळे खाताना त्यात काहीच क्रंच राहणार नाही. शिवाय त्याला पाणी लागल्याने त्याची चवही थोडी बिघडण्याची शक्यता आहे. या सर्व कारणांमुळे अशा पद्धतीने नारळ उकळत्या पाण्यात टाकून खोबरं काढणं अनेकांना पटलेलं नाही. कुणी काहीही म्हटलं तरी शेवटी आपला कम्फर्ट महत्त्वाचा. त्यामुळे तुम्हाला जर ही ट्रिक सोपी वाटत असेल आणि आवडली असेल, तर करून बघायला काहीच हरकत नाही. 

 

Web Title: How to open coconut without any tools, How to separate coconut from the shell?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.