Join us  

बरणीचं झाकण उघडतच नाहीये? ४ सोप्या ट्रिक्स, कमी कष्टांत झाकण उघडेल चटकन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2022 9:10 AM

How to Open a Difficult Jar: असं बऱ्याचदा होतं, हलक्या हाताने आपण बरणीचं झाकण (lid of a jar which is very tight) अगदी पक्कं लावून टाकतो आणि मग मात्र ते चटकन उघडतच नाही. त्यासाठीच हे काही सोपे उपाय.

ठळक मुद्देगडबडीमुळे झाकणाचे आणि बरणीचे आटे एकमेकांवर व्यवस्थित बसत नाहीत. त्यामुळे मग झाकण अगदी पक्कं होऊन जातं

हा अनुभव प्रत्येकीलाच आलेला असतो. रोजच्या घाई- गडबडीत आपण एखाद्या बरणीचं झाकण लावायला जातो. पण गडबडीमुळे झाकणाचे आणि बरणीचे आटे एकमेकांवर व्यवस्थित बसत नाहीत. त्यामुळे मग झाकण अगदी पक्कं (How to open the lid of a jar which is very tight?) होऊन जातं आणि मग ते काहीही केलं तरी सहजासहजी निघत नाही. प्लास्टिकचा डबा असेल तर एकवेळ ठिक. पण काचेची बरणी असेल तर मात्र तिचं झाकण उघडणं आणखीनच नाजूक काम होऊन जातं. कारण कुठेही धक्का लागला तर बरणी फुटू शकते. म्हणूनच असं पक्कं बसलेलं झाकण उघडण्यासाठी हे काही उपाय करून बघा. (home remedies to open tight lid of a jar quickly)

 

बरणीचं पक्कं बसलेलं झाकण उघडण्यासाठी उपाय१. झाकणावर थोडा जोर द्याबरणीच्या झाकणाचे जे टोक आहे, त्या संपूर्ण गोलाकार टोकावर एखाद्या चमच्याने किंवा लाटण्याने हलका जोर देऊन ठोका. वरतून जोर दिला तर झाकणाचे आटे ढिले होऊन ते लवकर निघू शकते.

२. वरणीवर खालच्या बाजूने माराबरणी थोडी तिरकी करा. पुर्णपणे उलटी करू नका. साधारण ४५ डिग्री कोनामध्ये वाकडी करून ती एका हाताने पकडा. दुसऱ्या हाताच्या तळव्याने बरणीच्या खालच्या बाजूवर ५ ते ६ वेळा मारा. यानंतर पुन्हा बरणी सरळ करून झाकण उघडण्याचा प्रयत्न करा.

photo credit- google

३. गरम पाण्यात ठेवाएका पातेल्यात गरम पाणी घ्या. त्या पाण्यात बरणी उलटी करून ठेवा. बरणीचं झाकणं आणि त्याखालचा काही भाग पाण्यात बुडेल अशा पद्धतीने बरणी पाण्यात ठेवा. साधारण ४ ते ५ मिनिटांनी बरणी पाण्यातून काढा आणि तिचं झाकण उघडून पहा. गरम पाण्यामुळे झाकणाचे आटे ढिले होतील. पण पाणी खूप जास्त कडक करू नका. कारण कडक पाण्यात काचेची बरणी तडकण्याची भीती असते.

 

४. हेअर ड्रायरहेअर ड्रायरचा वापर करूनही तुम्ही बरणीचं झाकण उघडू शकता. यासाठी ड्रायर सुरू करा आणि त्याने बरणीच्या झाकणाला गरम वाफ द्या. झाकण आणि बरणी यांच्यामध्ये जी जागा आहे, त्या छोट्याशा फटीमध्ये ड्रायरच्या गरम वाफा सोडण्याचा प्रयत्न करा. यामुळेही झाकण चटकन निघण्यास मदत होईल. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्स