Lokmat Sakhi >Social Viral > कपाट उघडताच साड्यांचा ढिग कोसळतो? या ३ पद्धतींनी घाला घडी - साडीची घडी राहील जशीच्यातशी...

कपाट उघडताच साड्यांचा ढिग कोसळतो? या ३ पद्धतींनी घाला घडी - साडीची घडी राहील जशीच्यातशी...

How To Organize Saree Cabinet : Best Way To Organise Your Saree Wardrobe : What is a good way to organize and store saree : Saree Organization Ideas & Tips : Tips & tricks to organize your sarees : कपाटातील साड्यांच्या वारंवार घड्या विस्कटतात तर या ३ सोप्या पद्धतींनी घाला घडी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2025 19:31 IST2025-03-19T19:22:01+5:302025-03-19T19:31:58+5:30

How To Organize Saree Cabinet : Best Way To Organise Your Saree Wardrobe : What is a good way to organize and store saree : Saree Organization Ideas & Tips : Tips & tricks to organize your sarees : कपाटातील साड्यांच्या वारंवार घड्या विस्कटतात तर या ३ सोप्या पद्धतींनी घाला घडी...

How To Organize Saree Cabinet Best Way To Organise Your Saree Wardrobe Tips & tricks to organize your sarees | कपाट उघडताच साड्यांचा ढिग कोसळतो? या ३ पद्धतींनी घाला घडी - साडीची घडी राहील जशीच्यातशी...

कपाट उघडताच साड्यांचा ढिग कोसळतो? या ३ पद्धतींनी घाला घडी - साडीची घडी राहील जशीच्यातशी...

आपल्या सगळ्यांच्याच कपाटांत वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर साड्या असतात. काहीवेळा या सगळ्या साड्या कपाटांत व्यवस्थित ऑर्गनाईझ करुन ठेवायच्या कशा असा प्रश्न प्रत्येकीला सतावतो. काहीवेळा तर या साड्यांचा पसारा इतका वाढतो की कपाट  उघडताच साड्यांचा डोंगरच अंगावर कोसळतो. या कपाटातील साड्यांचा (How To Organize Saree Cabinet) पसारा कितीही (Tips & tricks to organize your sarees) आवरला तरीही कपाट कधी नीट लावलेच जात नाही. या कपाटातील साड्यांच्या गर्दीत काहीवेळा साडीवरचा ब्लाऊज, परकर देखील हरवतात. अशा परिस्थितीत, आयत्या घाईच्या वेळी साडी एकीकडे, ब्लाऊज एकीकडे आणि परकर तर अजून दुसरीकडे अशी वेळ येते(Best Way To Organise Your Saree Wardrobe).

साड्या कितीही व्यवस्थित आवरुन घडी घालून ठेवल्या तरीही त्यांची घडी विस्कटून त्या कपाटात अस्ताव्यस्त पसरतात. या इतक्या महागामोलाच्या साड्या (Best Way To Organise Your Saree Wardrobe) आपण विकत घेऊन जर त्या व्यवस्थित घडी घालून ठेवल्या नाहीत तर त्या खराब होतात. अशा साड्या चुरतात, काहीवेळा त्या नीट न ठेवल्याने त्यावरील डिझाइन्स किंवा हेव्ही वर्क, धागा वर्क खराब होण्याची शक्यता असते. यासाठीच, कपाटात साड्या नीट ऑर्गनाईझ करण्यासाठी तसेच कमी जागेतही साड्या व्यवस्थित ठेवण्यासाठी साड्यांची एका विशिष्ट पद्धतीने घडी(Tips & tricks to organize your sarees) घालावी लागते. साड्या कपाटांत नीट ऑर्गनाईझ करुन ठेवण्यासाठी साड्यांची कोणत्या तीन प्रकारे घडी घालू शकतो ते पाहूयात.(What is a good way to organize and store saree).   

साड्यांच्या घड्या घालण्याच्या ३ सोप्या ट्रिक...

१. पहिल्या पद्धतीमध्ये एखाद्या खणाप्रमाणे साडीची त्रिकोणी घडी घालायची आहे. यासाठी साडीची आपण नेहमी घडी घालतो तशी अर्धी घडी घालून घ्यावी. त्यानंतर साडीची अर्धी घडी घातल्यावर ती सपाट पृष्ठभागावर अंथरावी. मग साडीच्या एका कोपऱ्यातून दुमडून तिची त्रिकोणी घडी घालावी. मग हळूहळू अशीच त्रिकोणी घडी घालत एखाद्या खणाप्रमाणे साडीची त्रिकोणी घडी घालावी. सगळ्यांत शेवटी साडीचे शेवटचे टोकं या खण घडी मध्ये अडकवून घ्यावे. मग या खण घडीमध्ये आपण त्या साडीचा ब्लाऊज देखील ठेवू शकतो. 

उकाड्यामुळे साडी नेसणं नको वाटतं? 'या' ५ फॅब्रिक्सच्या साड्या नेसा, कम्फर्टेबल-स्टायलिश आणि उकडणारही नाही...


नाजूक आरी वर्क केलेले महागडे ब्लाऊज कपाटांत ठेवताना लक्षात ठेवा ५ टिप्स - चमक राहील कायम, खराब होणार नाहीत...

२. साडी जर तुम्हांला हॅंगरवर लावायची असेल तर आपण अशा पद्धतीने घडी करु शकता. हॅंगरवर लटकवलेली साडी अनेकदा खाली पडून त्याची घडी विस्कटते यासाठी हॅंगरवर साडी लटकवण्याची सोपी पद्धत पाहा. यासाठी सर्वात आधी साडीची उभी घडी घालून घ्यावी. साडीची उभी घडी घातल्यानंतर एका बाजूने हँगर घालून साडीचा ३/४ भाग हंगरवर आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यावा त्यानंतर दुसऱ्या बाजूने साडीचा उरलेला भाग हॅंगरमध्ये अडकवून घ्यावा. अशा पद्धतीने घडी घातल्यास साडी हॅंगरवर अगदी फिट बसते तसेच हॅंगरवरुन खाली पडत देखील नाही. 

साडीचे मोठे काठ वापरुन ब्लाऊजला द्या नवा लूक, नेहमीचे ब्लाऊज दिसतील सुंदर आणि आकर्षक...


३. सर्वातआधी साडीची आपण नेहमीप्रमाणे घडी घालतो तशी घडी घालूंन घ्यावी. त्यानंतर साडीच्या आडव्या घडीत आत परकर ठेवावा. साडीची आडवी घडी घालून त्यात परकरची लहानशी घडी घालून ठेवावा. आता साडीच्या आत परकर ठेवून वर साडीची अजून एक आडवी घडी घालून घ्यावी. त्यानंतर त्या साडीचा ब्लाऊज घेऊन त्याची संपूर्ण बटण उघडून तो एका सपाट पृष्ठभागावर व्यवस्थित अंथरुन घ्यावा. आता या ब्लाऊजमध्ये चौकोनी घडी घालून घेतलेली साडी व्यवस्थित ठेवावी. आता या ब्लाऊजची बटण लावून साडी या ब्लाऊज मध्ये व्यवस्थित बसेल अशी पॅकिंग करून घ्यावी. त्यानंतर या ब्लाऊजच्या दोन्ही बाह्या आतल्या बाजूने दुमडून घेऊन साडीच्या घडीच्या आत ठेवाव्यात. जर आपल्या ब्लाऊजला मागच्या बाजूने जशी लटकनची दोरी असते तशी असेल तर या दोरीच्या मदतीने साडी आणि ब्लाऊज एकत्रित बांधून घ्यावे. अशा प्रकारे आपण ही सोपी ट्रिक वापरून साडीची घडी घालू शकता.


Web Title: How To Organize Saree Cabinet Best Way To Organise Your Saree Wardrobe Tips & tricks to organize your sarees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.