Lokmat Sakhi >Social Viral > फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

Cleaning Tips For Wooden Furniture: लाकडी फर्निचरच्या पॉलिशिंगवर जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेच करून पाहा...(how to polish wooden furniture at home?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2024 02:59 PM2024-10-11T14:59:13+5:302024-10-11T18:03:00+5:30

Cleaning Tips For Wooden Furniture: लाकडी फर्निचरच्या पॉलिशिंगवर जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा घरगुती उपाय लगेच करून पाहा...(how to polish wooden furniture at home?)

how to polish wooden furniture at home, simple tips and tricks to polish wooden furniture | फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

फक्त १० रुपयांत लाकडी फर्निचर चमकेल अगदी पॉलिश केल्यासारखंच! पाहा दिवाळीच्या स्वच्छतेसाठी खास ट्रिक...

Highlightsसगळे पदार्थ हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि या मिश्रणाने लाकडी फर्निचर पुसून घ्या. अगदी पॉलिश केल्याप्रमाणे ते चकाचक होईल. 

हल्ली प्रत्येकाच्याच घरात थोडेफार का असेना पण लाकडी फर्निचर हमखास असतेच. हे फर्निचर जर तुम्ही व्यवस्थित मेंटेन केले तर ते दिर्घकाळ टिकते. म्हणूनच महिन्यातून ३ ते ४ वेळा त्याची व्यवस्थित स्वच्छता करणे, वर्षातून एकदा त्याला पॉलिश करणे गरजेचे ठरते. पण लाकडी फर्निचरला पॉलिशिंग करणे हे थोडे वेळखाऊ आणि खर्चिक काम आहे (how to polish wooden furniture at home?). आता तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल आणि त्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल तर हा एक सोपा उपाय तुम्ही करून पाहू शकता. यामध्ये कमीतकमी पैशांत तुमचं फर्निचर अगदी पॉलिश केल्याप्रमाणे चकाचक चमकेल...(simple tips and tricks to polish wooden furniture)

 

लाकडी फर्निचरला कशी पॉलिश करावी?

लाकडी फर्निचरवर पॉलिश केल्याप्रमाणे चमक कशी आणावी, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ housewife_to_homemaker या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

पोटावर साचलेली चरबी महिनाभरात कमी होईल, फक्त ४ व्यायाम करा! सुटलेलं पोट गायब

यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की सगळ्यात आधी तर तुमचे लाकडी फर्निचर एकदा व्यवस्थित कोरड्या फडक्याने पुसून घ्या. जेणेकरून त्यावरची धूळ, घाण निघून जाईल. त्यानंतर जर फर्निचरवर लहान- मोठ्या फटी असतील तर त्या ही एखाद्या टोकदार वस्तूला कापड गुंडाळून स्वच्छ करून घ्या.

 

त्यानंतर एका बादलीमध्ये पाणी घ्या. त्यात लिक्विड डिशवॉश आणि व्हिनेगर सम प्रमाणात टाका आणि या मिश्रणाने लाकडी फर्निचर स्वच्छ पुसून घ्या.

४- ५ दिवसांतच आलं सुकून जातं? २ खास उपाय- ६ महिने आलं राहील एकदम फ्रेश- सुगंधी

त्यानंतर एका भांड्यामध्ये व्हिनेगर, ऑलिव्ह ऑईल समप्रमाणात घ्या. त्यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही इसेंशियल ऑईलचे काही थेंब टाका. सगळे पदार्थ हलवून व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि या मिश्रणाने लाकडी फर्निचर पुसून घ्या. अगदी पॉलिश केल्याप्रमाणे ते चकाचक होईल. 



 

Web Title: how to polish wooden furniture at home, simple tips and tricks to polish wooden furniture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.