Lokmat Sakhi >Social Viral > निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

Kitchen Tips For Pouring Oil In Bottle: हा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. त्यामुळेच आता निमुळत्या तोंडाच्या बाटलीमध्ये तेल किंवा पाणी कसं ओतावं, याचा छानसा उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2023 05:04 PM2023-08-09T17:04:17+5:302023-08-09T17:05:20+5:30

Kitchen Tips For Pouring Oil In Bottle: हा अनुभव आपण नेहमीच घेत असतो. त्यामुळेच आता निमुळत्या तोंडाच्या बाटलीमध्ये तेल किंवा पाणी कसं ओतावं, याचा छानसा उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी सांगितला आहे.

How to pour oil in bottle without spilling? Special trick shared by Kunal Kapoor | निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

निमुळत्या तोंडाच्या बाटलीत तेल-पाणी ओतताना सांडतं? शेफ कुणाल कपूर सांगतात १ उपाय, सांडलवंड बंद

Highlightsत्यांनी तेल ओतण्याविषयी शेअर केलेला व्हिडिओही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण यामुळे पसारा होऊन तुमचं काम वाढणार नाही, असं नक्कीच वाटतं.

स्वयंपाक घरातली किंवा देवाच्या जवळ ठेवलेली तेलाची बाटली रिकामी झाली की ती घासून- पुसून ठेवतो आणि पुन्हा तेल भरतो. बाटलीचं तोंड जर अगदीच अरुंद असेल तर ती भरणं मोठं कठीण काम. कारण कितीही काळजी घेतली तरी आपल्याकडून काही नीट, एकसंध धार पडत नाही आणि मग तेल खाली जमिनीवर सांडतं (How to pour oil in bottle without spilling?). काही जणींना हा अंदाज असतोच. त्यामुळे त्या ताटात बाटली ठेवतात. पण जमिनीवर नाहीतर मग ताटात व्हायचा तो पसारा होतोच. आता हे सगळं कसं टाळायचं आणि बाटलीत तेल कसं व्यवस्थित ओतायचं, याचा छानसा उपाय सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (Kitchen tips)

 

कुणाल कपूर नेहमीच वेगवेगळ्या रेसिपी सोशल मिडियावर शेअर करत असतात. पण रेसिपींसोबतच ते बऱ्याचदा काही किचन टिप्सही सांगत असतात.

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक म्हणत मुलंही आवडीनं खातील भोपळ्याचं धिरडं! नाश्त्यासाठी खमंग रेसिपी

भाज्यांची निवड कशी करावी, कोणती भाजी कशी चिरावी, काम पटापट होण्यासाठी स्वयंपाक घरात कोणकोणते वेगवेगळे चाकू असावेत, अशी बरीचशी माहिती ते नेहमीच देत असतात. आता त्यांनी तेल ओतण्याविषयी शेअर केलेला व्हिडिओही अतिशय उपयुक्त ठरणार आहे. कारण यामुळे पसारा होऊन तुमचं काम वाढणार नाही, असं नक्कीच वाटतं.

 

अरुंद तोंडाच्या बाटलीत तेल कसं ओतायचं?
१. यासाठी कुणाल कपूर यांनी एका लांब पण अगदी बारीक असणाऱ्या काडीचा वापर करायला सांगितला आहे. कुल्फीची काडी यासाठी उत्तम ठरेल.

अधिकमास स्पेशल: जावयाला वाण द्यायला स्टिलचं ताटच कशाला, पाहा ३ सुंदर-सुबक पर्याय

२. ही काडी बाटलीमध्ये धरा. काडी अर्धी बाटलीमध्ये तर अर्धी बाटलीच्या वर असावी. आता त्या काडीवर बारीक धारेने तेल ओता. ओतलेले तेल काडीच्या आधाराने अगदी सरळ रेषेत, न सांडता बाटलीमध्ये जाईल. 
 

Web Title: How to pour oil in bottle without spilling? Special trick shared by Kunal Kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.