भारतीय पारंपरिक पद्धतीत, एखाद्या खास सणाला, उपवासाच्या दिवशी केळीच्या पानात जेवण वाढलं जातं. आपल्याकडे केळीच्या पानांना अतिशय धार्मिक महत्व आहे. देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी किंवा पूजेसाठी म्हणून केळीच्या पानाचा खास वापर केला जातो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढायची फार जुनी परंपरा आहे. केळीच्या पानांचा उपयोग फक्त जेवण वाढण्यासाठीच नाही तर जेवण शिजवण्यासाठी देखील त्याचा उपयोग करण्यात येतो(How to Store Banana Leaves).
गणपती उत्सवात प्रामुख्याने गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच जेवणावळ करण्यासाठी अजूनही काही घरात केळीच्या पानांचा(How do I preserve banana leaf for a long time?) वापर केला जातो. अजूनही कोकणात आणि केरळ सारख्या भागात केळीच्या पानात जेवण सर्व्ह केलं जातं. केळीच्या पानात खाल्लेल्या पदार्थांची चव खूपच खास लागते. नैवेद्यासाठी हिरव्या गार केळीच्या पानावर पांढऱ्या शुभ्र भाताची मुद आणि पिवळं धम्मक वरण त्यावर मोतिया रंगाच्या तूपाची धार पडते तेव्हा असा प्रसाद जेवणं म्हणजे अगदी स्वर्गसुख अनुभवल्यासारखं वाटतं. मात्र हा आनंद आजकाल फक्त सणासुदीलाच घेता येतो. केळीच्या पानात जेवण्याची परंपरा फक्त (The easiest way to preserve banana leaves) डोळ्यांनाच सुखावणारीच आहे असं नाही तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानात जेवणे लाभदायक ठरते. आपल्याकडे प्रामुख्याने गणेशोत्सवा दरम्यान केळीच्या पानांत प्रसादाचे (How To Keep Banana Leaves Fresh?) जेवण वाढले जाते. अशावेळी आपण ही केळीची पाने (How To Preserve Fresh Banana Leaves) एकदाच एकदम खरेदी करुन घरी आणून ठेवतो. असे असले तरीही ही पाने काही ठराविक दिवसांनंतर सुकून खराब होऊ लागतात, यामुळे ही पाने वाया जातात. असे होऊ नये म्हणून केळीची पाने खराब न होता दीर्घकाळ टिकावीत यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवूयात(How To Preserve Fresh Banana Leaves For A Long Time).
केळीची पाने दीर्घकाळ चांगली टिकवून ठेवण्याची एक सोपी ट्रिक...
आपण बाजारांतून केळीची पाने (Banana Leaf) एकदाच जास्तीची विकत घेऊन येतो. ही जास्तीची विकत आणलेली केळीची पाने काहीवेळा बराचकाळ टिकून राहत नाही. अशी पाने लगेच सुकून खराब होऊ लागतात. केळीची पाने लवकर खराब न होता दीर्घकाळ आहे तशीच स्टोअर करुन ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक लक्षांत ठेवूयात. केळीची पाने दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सर्वप्रथम खाकी रंगाच्या फूड ग्रेडेड पेपरमध्ये प्रत्येकी २ पाने ठेवून ती व्यवस्थित हलक्या हातांनी गोल गुंडाळून घ्यावीत. केळीच्या पानांना फूड ग्रेडेड पेपरमध्ये गुंडाळताना पानाच्या खालच्या बाजूचा ३ ते ४ इंचाचा भाग सोडून उरलेल्या पानांवर पेपर गुंडाळावा. आता एक भांडे घेऊन त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरुन घ्यावे. पाणी भरुन घेतल्यानंतर ही फूड ग्रेडेड पेपरमध्ये गुंडाळलेली केळीची पाने त्यात उभी करून ठेवावीत. केळीच्या पानांचा खालचा ३ ते ४ इंचाचा भाग त्या पाण्यांत संपूर्णपणे बुडेल असे पाहावे. या भांड्यातील पाण्याच्या रंगाकडे लक्ष द्यावे. पाण्याचा रंग बदलला तर किंवा ३ ते ४ दिवसांनी हे पाणी बदलून नवीन स्वच्छ पाणी घ्यावे. ही सोपी ट्रिक वापरून आपण एकदा विकत आणलेली केळीची पाने पुढील १५ दिवस आहेत तशीच हिरवीगार, फ्रेश ठेवू शकता.
सुबक कळीदार मोदक करण्याची १ झटपट ट्रिक - मोदक न जमणारेही करतील उत्तम मोदक...
प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...
उकडीच्या मोदकांचे गणित जमत नाहीत, उकडताना फुटतात ? १० सोप्या टिप्स, कळीदार सुबक मोदक सहज जमतील...
इतर काही टिप्स लक्षांत ठेवूयात...
१. केळीची पाने विकत घेताना ती एकदम पिकलेली किंवा एकदम कोवळी असतील तर घेऊ नयेत.
२. केळीची पाने विकत घेताना पानांच्या वरचे टोक हे सुकलेले नाही याची खात्री करुन घ्यावी. पानांच्या वरचे टोक सुकलेले असेल तर अशी पाने घेणे शक्यतो टाळावे.
३. बाजारांत बहुदा केळीची पाने ही वर्तमानपत्रांत गुंडाळून विकायला ठेवलेली असतात, अशी पाने खरेदी करु नका.
४. जर आपण बाजारांतून विकत घेतलेले पान हे व्यवस्थित रॅप केलेले नसले तर घरी येऊन ते पान फूड ग्रेडेड पेपरमध्ये गुंडाळून त्याला रबर लावून ठेवावे.
५. केळीच्या पानावर थोडेसे पाणी असेल तर ते तसेच राहू द्यावे, हे पाणी पुसू नका. या पाण्याच्या ओलाव्यामुळे केळीची पाने दीर्घकाळ टिकून राहतात.