Lokmat Sakhi >Social Viral > फोन रात्रभर चार्जिंगला ठेवता? मोबाईलचा भयंकर स्फोट होण्याआधी ६ गोष्टी करा; खबरदारी घ्या

फोन रात्रभर चार्जिंगला ठेवता? मोबाईलचा भयंकर स्फोट होण्याआधी ६ गोष्टी करा; खबरदारी घ्या

How to prevent a mobile blast : ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. ओरिजिनल चार्जर व्यतिरिक्त तुम्ही फोन इतर कोणत्याही चार्जरने चार्ज केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 03:45 PM2023-04-28T15:45:35+5:302023-04-28T17:33:21+5:30

How to prevent a mobile blast : ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. ओरिजिनल चार्जर व्यतिरिक्त तुम्ही फोन इतर कोणत्याही चार्जरने चार्ज केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

How to prevent a mobile blast : How does a smartphone battery explode and how you can prevent it | फोन रात्रभर चार्जिंगला ठेवता? मोबाईलचा भयंकर स्फोट होण्याआधी ६ गोष्टी करा; खबरदारी घ्या

फोन रात्रभर चार्जिंगला ठेवता? मोबाईलचा भयंकर स्फोट होण्याआधी ६ गोष्टी करा; खबरदारी घ्या

आजकाल लहान मुलांच्या हातात फोन देऊन पालक दिवसभर निश्चिंतपणे राहतात. मुलांच्या हातात एकदा फोन दिला ते तासनतास फोनवर वेळ घालवतात आणि पालकांना त्रासही देत नाहीत. पण ही सवय जीवघेणी सुद्धा ठरू शकते. (How to prevent a mobile blast) मोबाईल फोनचा ब्लास्ट झाल्यानं एक चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच समोर आहे.  या घटनेनंतर आपल्या मुलांना बिंधास्तपणे मोबाईल वापरण्यासाठी देणारे पालक चिंतेत  आहेत.

मोबाईल फोन वापरताना कोणती काळजी घ्यावी, मोबाईल फोन ब्लास्ट का होतो हे समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे. (How does a smartphone battery explode and how you can prevent it) नेहमी मोबाईल फोन ब्लास्ट झाल्याच्या दुर्दैवी घटना घटतात. याचे कारण टेक्निकल असले तरी ब्लास्ट बॅटरी होते तो मोबाईलचाच एक भाग आहे. बॅटरी व्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे फोन ब्लास्ट होऊ शकतो.

फोन ब्लास्ट होण्याची कारणं  

१) आता सर्वचजण  त्यांच्या फोनवरच अलार्म लावतात, त्यामुळे लोक फोन उशीखाली किंवा सोबत ठेवून झोपतात. फोन उशीखाली ठेवल्याने मोबाईलचे तापमान वाढते, ज्यामुळे त्याच्या बॅटरीवर दबाव येतो. यामुळे फोन जास्त गरम होऊन स्फोट होऊ शकतो.

२) जर तुमचा मोबाईल कोणत्याही कारणाने गरम होत असेल तर लगेच वापरणे बंद करा आणि जेव्हा फोन सामान्य तापमानात येतो तेव्हाच वापरा.

३) लोक अनेकदा फोन चार्जवर ठेवून बोलत राहतात, पण फोनमध्ये स्फोट होण्याचे हेही एक प्रमुख कारण बनू शकते. चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान जास्त असते त्यामुळे फोन गरम राहतो. अशा स्थितीत फोन चार्ज होत असताना त्यावर बोलण्यासाठी कधीही कानाजवळ घेऊ नका.

सकाळी की रात्री, कोणत्यावेळी चपाती खाल्ल्यानं लवकर वजन कमी होतं? फिट राहायचं तर...

४) फोनचा स्फोट होण्याचे मुख्य कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरींगमधील चूक असू शकते. हँडसेटला उर्जा देणारी लिथियम-आयन बॅटरी फोनमध्ये बसवण्यापूर्वी त्याची पूर्ण तपासणी करणे आवश्यक आहे.

५) फोनचा स्फोट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बॅटरीची स्थिती. ज्यामुळे शॉर्ट-सर्किट, ओव्हरहिटिंग आणि बरेच काही होऊ शकते.

६) ही एक सामान्य चूक आहे जी आपल्यापैकी बहुतेकजण करतात. ओरिजिनल चार्जर व्यतिरिक्त तुम्ही फोन इतर कोणत्याही चार्जरने चार्ज केल्यास ते धोकादायक ठरू शकते.

 स्फोट होऊ नये म्हणून काय करायचं?

१) फोनसोबत दिल्या जाणाऱ्या इंस्ट्रक्शन्सकडे बारीक लक्ष द्या. 

२) बॅटरी फुगणं, फोनचा आवाज येणं याकडे दुर्लक्ष करू नका.  

३) फोन सतत चार्जला लावू नका.

४) पाण्यात संपर्कात फोन येणार नाही याची काळजी घ्या. 

छातीचा आकार बेढब दिसतो, स्तन ओघळलेत? ४ सोपे व्यायाम; सुडौल, मेंटेन दिसाल

५) फोन जास्त गरम झाल्यानंतर चार्ज करू नका किंवा उशीजवळही ठेवू नका.  

६) रात्रभर मोबाईल चार्जला ठेवू नका, फोन चार्जला ठेवून गाणी ऐकण्याची चूक करू नका. 

Web Title: How to prevent a mobile blast : How does a smartphone battery explode and how you can prevent it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.