Lokmat Sakhi >Social Viral > पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

How To prevent Cloths from fungus during Monsoon : बुरशी कपड्यांना येऊच नये म्हणून करायला हवेत असे सोपे उपाय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2023 03:06 PM2023-08-13T15:06:41+5:302023-08-13T15:08:59+5:30

How To prevent Cloths from fungus during Monsoon : बुरशी कपड्यांना येऊच नये म्हणून करायला हवेत असे सोपे उपाय..

How To prevent Cloths from fungus during Monsoon : Rainy humid air causing fungus on clothes? 3 remedies; Clothes will stay dry and clean... | पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

पावसाळी दमट हवेमुळे कपड्यांना बुरशी येते? ३ उपाय; कपडे राहतील कोरडे-स्वच्छ...

पावसाळ्यात सगळ्यात मोठी अडचण असते ती म्हणजे कपडे धुण्याची आणि ते वाळण्याची. पावसाळी दमट आणि ओलसर हवेमुळे कपडे लवकर वाळत नाहीत आणि त्यामुळे घरभर कपड्यांचा एकप्रकारचा कुबट वास येत राहतो. इतकेच नाही तर घाम आलेले किंवा पावसाने ओले झालेले कपडेही या काळात लवकर सुकत नाहीत. असे ओलसर कपडे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. कारण यामुळे त्वचेचे विविध विकार होण्याची शक्यता असते. तसेच ओलसरपणा राहील्याने काही वेळा सर्दी-खोकला किंवा ताप येण्याचीही शक्यता असते. म्हणूनच कपडे पूर्ण कोरडे झाल्याशिवाय अजिबात घालू नयेत असे घरातील मोठी मंडळी आपल्याला वारंवार सांगत असतात (How To prevent Cloths from fungus during Monsoon). 

इतकेच नाही तर या ओलसर किंवा दमट हवेमुळे खुंटीला टांगलेले आणि अगदी कपाटात ठेवलेल्या कपड्यांनाही बुरशी येण्याची शक्यता असते. आजुबाजूाच एखादा कपडा जरी ओलसर राहीला तरी सगळ्या कपड्यांना वास तर लागतोच पण त्यांना लगेच पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाची बुरशी येते. ही बुरशी एकदा यायला लागली की ती संपूर्ण कपड्यांना येते आणि मग चांगले महागडे कपडेही पूर्ण खराब होतात. मग या कपड्यांवर एकप्रकारचे बुरशीचे डाग पडणे, त्यांना विचित्र वास येणे अशा समस्या सुरू होतात. पण अशी बुरशी कपड्यांना येऊच नये म्हणून करायला हवेत असे सोपे उपाय..

(Image : Google)
(Image : Google)

१. कपडे व्यवस्थित पद्धतीने ठेवा

कपडे अव्यवस्थित ठेवणे हे कपड्यांना बुरशी किंवा भुरा लागण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून किमान पावसाळ्यात तरी कपडे कपाटात नीट ठेवायला हवेत. कपडे घड्या करुन ठेवताना ते पूर्ण वाळले आहेत की नाही याची खात्री करायला हवी. तसेच ज्या कपाटात कपडे ठेवत आहोत ते कपाटही व्यवस्थित कोरडे आहे की नाही हे तपासून घ्यायला हवे. तसेच कपडे एकदम एकमेकांवर किंवा बाजूला रचून न ठेवता त्यामध्ये थोडे थोडे अंतर ठेवायला हवे. मोकळी जागा असल्यास मॉईश्चर जमा होत नाही आणि कपडे कोरडे राहण्यास मदत होते. 

२. नेफ्थलिन बॉल्सचा करा वापर

पावसाळ्याच्या दिवसांत कपडे ठेवताना नेफ्थलिन बॉल्सचा वापर करायला हवा. हे बॉल्स कपड्यांतील ओलावा तर शोषून घेतातच पण त्यासोबत कपड्यांना बुरशीपासून वाचवण्यासही अतिशय उपयुक्त ठरतात. 

३. कपड्यांचे वॉशिंग रुटीन निश्चित करा

पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा कपडे वाळणार नाहीत म्हणून ते कित्येक दिवस धुतलेच जात नाहीत. त्यामुळे एकच कपडे बरेचदा वापरले जातात. पण असे केल्याने कपड्यांवर बुरशी येण्याची शक्यता जास्त प्रमाणात वाढते. या काळात अनेकदा आपल्याला घाम आल्यानेही कपडे ओलसर असतात. हे ओलसर कपडे काही दिवस तसेच ठेवले गेल्यास त्यांना लगेचच भुरा लागतो. त्यामुळे एकदा घातलेले कपडे वेळच्या वेळी लगेच धुवून टाका.

Web Title: How To prevent Cloths from fungus during Monsoon : Rainy humid air causing fungus on clothes? 3 remedies; Clothes will stay dry and clean...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.