घरात झुरळं जास्त झाली असतील तर जगणंच मुश्किल होतं. अशा स्थितीत काही घरगुती उपाय करून तुम्ही २ मिनिटांत झुरळांना पळवून लावू शकता. (Home Tricks) झुरळांना कायमचं पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय फायदेशीर ठरतील. ज्यामुळे घर स्वच्छ राहील आणि आजारही पसरणार नाहीत. झुरळांना पळवून लावण्याचे काही घरगुती उपाय तुमचं काम सोपं करतील ज्यामुळे घर केमिकल फ्री राहील. (How to Prevent Cockroaches In Your Kitchen)
१) तमालपत्र
जेवणाची चव वाढवण्यासाठी तमालपत्र मोठ्या प्रमाणात वापरले जाते. ज्यामुळे झुरळांना दूर पळवण्यास मदत होते. तुम्ही हातात तेजपत्ता घेऊन बारीक करून घ्या नंतर स्वंयपाकघरात जिथे झुरळं येतात तिथे ठेवा. ज्यामुळे कॉकरॉच बाहेर निघतील आणि दुर्गंधही येणार नाही. ( Just Two Minutes All The Cockroaches From The Kitchen Will Be Out)
२) बोरीक पावडर कॉकरॉच होतील क्विन बोल्ड
बोरीक पावडर तुम्हाला कोणत्याही किराण्याच्या दुकानात मिळेल. तुम्ही त्याचे पीठ मळून छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घ्या. स्वंयपाकघरात ज्या ठिकाणी झुरळं येतात त्या ठिकाणी या गोळ्या ठेवा ज्यामुळे झुरळं दूर पळतील. महिनातून एकदा किंवा वीस दिवसातून एकदा हा उपाय करू शकता. ज्यामुळे झुरळं परत घरात शिरणार नाहीत.
प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट
३) बेकींग सोडा झुरळांसाठी विषाप्रमाणे
बेकिंग सोडा प्रत्येकाच्या स्वंयपाकघरात सहज उपलब्ध होतो. यासाठी एक कप पाण्यात बेकींग सोडा घालून त्यात साखर मिसळा आणि स्वंयपाकघराच्या प्रत्येक कोपऱ्यावर ठेवा. साखरेचा वास झुरळांना स्वतकडे आकर्षित करेल. बेकींग सोडा झुरळांसाठी विषाप्रमाणे असतो. यामुळे झुरळं पटापट नष्ट होतील. बेकींग सोड्याचा वास बराचवेळ किचनमध्ये तसाच राहतो ज्यामुळे झुरळं परत येत नाहीत.
पीठ कसंही मळा, चपात्या वातड होतात? पीठ मळताना 'हा' पदार्थ मिसळा, मऊ राहतील चपात्या
४) लवंग
लवंगाचा रंग दिसायला कॉकरॉचसारखा असतो. पण झुरळांची विल्हेवाट लावण्याासाठी लवंग फायदेशीर ठरतात. स्वंयपाकघरात कॉकरॉच फिरत असत असतील किंवा आसपास येत नसतील तर ड्रॉव्हरमध्ये किंवा कानाकोपऱ्यात लवंग ठेवा. प्रत्येक महिन्याला बदलत राहा. झुरळं कायमची पळून जाण्यास मदत होईल.