फ्रिज ही आपल्या रोजच्या वापरातील सर्वात महत्वाची वस्तू आहे. विशेषतः उन्हाळ्यात तर आपल्याला फ्रिजची गरज भासतेच. फ्रिज अनेक कारणांसाठी आपल्याला उपयुक्त ठरतो. फ्रिजमध्ये पाणी थंड करण्यापासून ते भाज्या स्टोअर करुन ठेवण्यापर्यंतची सगळी कामे केली जातात. फ्रिज हा आपल्या रोजच्या वापरासाठी कितीही उपयोगी पडला तरीही दर आठवड्याला किंवा पंधरा दिवसांनतर फ्रिजरमध्ये जो बर्फ साचतो तो साफ करणे म्हणजे एक प्रकारची डोकेदुखीच. फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचण्याला फ्रिजर फ्रॉस्ट होणे असे म्हटले जाते. कधी चुकून हा साचलेला बर्फ काढण्यास उशीर झालाच, तर बर्फाचं पाणी घरभर होतं.
आपल्या घरात असणाऱ्या फ्रिजरच्या आतील भिंती आणि शेल्फवर जमा झालेला गोठलेला ओलावा सामान्यतः फ्रिजर फ्रॉस्ट म्हणून ओळखला जातो. हा ओलावा तुमच्या फ्रिजरमधील बाष्पीभवन कॉइलच्या संपर्कात येतो आणि नंतर गोठतो. त्यामुळे हा असा बर्फ फ्रिजमध्ये साठतो. बाष्पीभवन कॉइलवर ओलावा तसा अनेक कारणांमुळे जमा होतो. या अतिरिक्त बर्फामुळे फ्रिजला वेगळाच उग्र वास येतो. साठवलेले अन्नपदार्थ त्यामुळे खराब होऊ शकतात आणि फ्रिजर फ्रॉस्ट सतत झाल्यामुळे फ्रिजची कार्यक्षमता देखील कमकुवत होते. फ्रिज योग्य रीतीने वापरला नाही तर फ्रिजमध्ये बर्फ साचून त्यातूत कुबट वास येऊ शकतो. फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचत असल्यास अशावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो(How To Prevent Ice Buildup In Your Freezer : 7 East Ways To Prevent Ice Buildup In Your Freezer).
फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ कोणत्या कारणांमुळे साचतो?
१. फ्रिजरचे तापमान योग्यरीत्या सेट करणे :- फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचू नये यासाठी फ्रिजरचे तापमान योग्यरीत्या सेट करणे अतिशय महत्वाचे असते. जर आपल्या फ्रिजमध्ये वारंवार बर्फ जमा होत असेल तर आपल्या फ्रिजचे तापमान योग्यरीत्या सेट केले नाही, असे समजावे. सामान्यतः फ्रिजरचे तापमान तापमान १८ अंश सेल्सिअस इतके सेट करणे आवश्यक आहे. फ्रिजरमध्ये सतत बर्फ साचू नये यासाठी फ्रिजरचे तापमान गरजेप्रमाणे सेट केले आहे की नाही याची एकदा खात्री करुन घ्यावी.
२. फ्रिजरच्या ड्रेनची वेळोवेळी करा साफसफाई :- फ्रिजच्या मागील बाजूस एक पाईप असतो, जो फ्रिजमधील जास्तीचे पाणी बाहेर काढून टाकण्याचे काम करतो. जर हे कार्य थांबले तर फ्रिजरमध्ये बर्फ अधिक गोठण्यास सुरुवात होते. हे टाळण्यासाठी वेळोवेळी फ्रिजरच्या ड्रेनची स्वच्छता करावी.
फक्त ५ गोष्टी करा, मोबाइल वर्षानूवर्षे बिघडणार नाही आणि डेटाही राहील सेफ....
३. फ्रिजचा दरवाजा बंद ठेवा :- जर तुमच्या फ्रिजमध्ये गरजेपेक्षा जास्त बर्फ गोठत असेल तर कदाचित त्यात जास्त ओलावा राहत असेल. फ्रिज वारंवार उघडल्याने आत उबदार हवा येते, जी थंड हवेमध्ये मिसळून आर्द्रता निर्माण करते आणि नंतर त्याचे बर्फात रूपांतर होते, त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच फ्रिज उघडा. खरंतर, फ्रिजर फ्रॉस्ट होण्याची कारणे बरीच आहेत. सगळ्यात नेहमीचं कारण म्हणजे फ्रिजचा दरवाजा खूप वेळ उघडा ठेवणे. फ्रिजचे दार खूप कमी वेळ उघड बंद करावे हा त्यावरचा उपाय आहे. जरी दार उघडले तर खूप वेळ ते उघडे ठेवू नये. फ्रिजरमध्ये सतत बर्फ साचू द्यायचा नसल्यास फ्रिजच्या दरवाजाची सतत उघडझाप करु नये.
४. खराब झालेली रबरी पट्टी वेळीच बदला :- खराब झालेली रबरी पट्टी किंवा फ्रिजची गॅस्केट हे फ्रिजमध्ये सतत बर्फ साचण्याचे मुख्य कारण असू शकते. फ्रिजच्या दाराला असलेली रबरी पट्टी किंवा गॅस्केट खराब झाल्यास बाहेरची उबदार किंवा गरम हवा आत जाते आणि आतली थंड हवा बाहेर पडते. यामुळे तुमच्या फ्रिजमध्ये सतत बर्फ साचू शकतो. यासाठी फ्रिजच्या दाराला असलेली रबरी पट्टी किंवा गॅस्केट वेळीच बदला.
५. कॉइलची योग्य स्वच्छता ठेवावी :- फ्रिजच्या मागील बाजूस कॉइल कंडेन्सर असतो. यामुळे फ्रिज कायम थंड ठेवण्याचे काम केले जाते. या कॉइलची योग्य साफसफाई केली नाही तर फ्रिज नीट काम करू शकत नाही. यामुळे फ्रिजच्या मागच्या बाजूला असणाऱ्या कॉइलची योग्य स्वच्छता ठेवावी .
पाणी पिण्याच्या बाटल्यांना कुबट वास येतोय? १ सोपा उपाय, बाटली होईल स्वच्छ-निर्जंतूक...
फ्रिजरमध्ये वारंवार बर्फ साचू नये यासाठी नेमके उपाय काय ?
१. आवश्यकतेपेक्षा जास्त वेळा फ्रिजरचा दरवाजा उघडू नका.
२. फ्रिजच्या दाराला असणारी गॅस्केट नियमितपणे तपासा.
३. फ्रिजरचा दरवाजा पूर्णपणे बंद झाला आहे याची खात्री करा.
४. फ्रिजमध्ये फक्त थंड केलेले अन्नपदार्थ ठेवा.
५. भट्टी, ड्रायर किंवा वॉटर हीटर यांसारख्या उबदार उपकरणांजवळ फ्रिज ठेवू नका.
६. फ्रिजच्या मागील बाजूस आणि भिंतीच्या दरम्यान जागा सोडा.
७. फ्रिजर योग्य तापमानावर सेट केल्याची खात्री करा.
फ्रिजरमध्ये बर्फ साचल्यास असा करा स्वच्छ :-
तुमच्या फ्रिजरमध्ये बर्फ जमा झाल्याचे लक्षात आल्यास ते स्वच्छ करावे. त्यासाठी फ्रिज बंद करावा. पूर्ण बर्फ वितळू द्यावा आणि मग ओलावा पुसून घ्यावा. सगळे कोरडे झाल्यावर फ्रिज पुन्हा सुरु करावा. चाकू किंवा इतर कोणत्याही तीक्ष्ण वस्तूने बर्फ खरवडून काढू नका. त्यामुळे फ्रिजचे नुकसान होऊ शकते.