Join us

दूध कधीच उतू जाऊ नये म्हणून ३ उपाय! नाहीतर गॅससमोर आपण उभं असूनही दूध जातं उतू, आवरायचा ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2023 12:11 IST

How to Prevent Milk From Boiling Over : दूध ऊतू जाऊ नये म्हणून खास ट्रिक्स..

दूध तापवायला ठेवलं की ते ऊतू जाणं ही तमाम महिलांची एक सामान्य समस्या आहे. दूध तापवणं हे एक महत्त्वाचं काम असतं. त्यामुळे आपण जेव्हा ओट्यासमोर असतो तेव्हाच आपण साधारणपणे दूध तापवायला ठेवतो. पण तरी एका मिनीटांत हे दूध वेगाने वर येतं आणि ऊतू जातंच. दूध ऊतू गेलं की सगळी गॅस शेगडी, ओटा सगळं खराब होतं आणि मग ते साफ करण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच राहत नाही. अशावेळी दूध वाया तर जातंच पण त्यावरची सायही वाया गेल्याने आपल्याला फार हळहळ वाटते. मग सगळं पातेलं खराब होतं आणि घासताना ते निघता निघत नाही. आता हे दूध ऊतू जाऊ नये म्हणून अशा कोणत्या युक्त्या आहेत ज्या वापरुन दूध वाया जाण्यापासून वाचवू शकतो (How to Prevent Milk From Boiling Over)...

१. दूध तापवताना पातेल्याला कडेने तेलाचे बोट फिरवावे. यामुळे दूध ऊतू जाण्यासाठी वर येते तेव्हा ते तेल लावले आहे तिथपर्यंतच वर येते. तेलामुळे ते आहे तिथेच अडते आणि ऊतू जाण्यापासून वाचते. त्यामुळे अशाप्रकारे पातेल्याला तेल लावणे हा एक चांगला पर्याय ठरु शकतो. 

२. याशिवाय दूध तापत असताना पातेल्यावर लाकडी उलथने किंवा लाकडी एखादी पट्टी आडवी ठेवावी. यामुळे दूध ऊतू जाण्यापासून वाचते. दूध वर येते तेव्हा या लाकडी पट्टीमुळे दूधावर आलेली साय फुटते आणि मग त्याखाली असलेले दूध आपोआप खाली दबले जाते. यामुळे दूध विनाकारण वाया जात नाही. 

३. तसेच दूध ऊतू जाऊ नये म्हणून काही जण आणखी एक पद्धत वापरतात. ती म्हणजे दूधाच्या पातेल्यात एक स्वच्छ धुतलेली स्टीलची वाटी ठेवायची आणि मग दूध तापायला ठेवायचे. ही वाटी आतमध्ये असल्याने दूध गरम झाले तरी ते एका मर्यादेपर्यंतच वर येते. खूप वर येत नाही. त्यामुळे दूध वाया जात नाही आणि पातेल्यातच राहते.   

टॅग्स :सोशल व्हायरलकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स