Lokmat Sakhi >Social Viral > टॉयलेट कायम पिवळट- दुर्गंधी घरभर पसरते? प्लास्टिक बॉटलचा करा सोपा उपाय; दुर्गंधी पसरणारच नाही..

टॉयलेट कायम पिवळट- दुर्गंधी घरभर पसरते? प्लास्टिक बॉटलचा करा सोपा उपाय; दुर्गंधी पसरणारच नाही..

How to prevent smell coming out from your toilet : प्लास्टिक बॉटल आणि बेकिंग सोड्याचा सोपा उपाय; सारखं साफ करण्याची गरजच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2024 10:01 PM2024-08-25T22:01:59+5:302024-08-25T22:03:15+5:30

How to prevent smell coming out from your toilet : प्लास्टिक बॉटल आणि बेकिंग सोड्याचा सोपा उपाय; सारखं साफ करण्याची गरजच नाही

How to prevent smell coming out from your toilet | टॉयलेट कायम पिवळट- दुर्गंधी घरभर पसरते? प्लास्टिक बॉटलचा करा सोपा उपाय; दुर्गंधी पसरणारच नाही..

टॉयलेट कायम पिवळट- दुर्गंधी घरभर पसरते? प्लास्टिक बॉटलचा करा सोपा उपाय; दुर्गंधी पसरणारच नाही..

घराची साफ सफाई केल्यानंतर बऱ्याचदा टॉयलेट साफ करायचं राहून जातं (Toilet). ज्यामुळे टॉयलेटमाधे पिवळट डाग तयार होतात. या डागांमुळे टॉयलेट घाणेरडे दिसते. शिवाय घरभर दुर्गंधीही पसरते (Cleaning Tips). टॉयलेट साफ करणं तसं अवघड काम. बऱ्याचदा टॉयलेटमधली घाण घासूनही निघत नाही.

नियमित साफ न केल्यास हे पिवळट डाग हट्टी डागांमध्ये रुपांतरीत होतात. त्यामुळे टॉयलेट साफ करणं गरजेचं आहे. जर आपल्याला नियमित टॉयलेट साफ करायला वेळ मिळत नसेल तर, एक DIY युक्ती करून पाहा. अगदी काही मिनिटात टॉयलेट साफ होईल. शिवाय घरभर दुर्गंधीही पसरणार नाही. टॉयलेट साफ करण्यासाठी प्लास्टिकच्या बाटलीचा नेमका वापर कसा करावा? पाहा(How to prevent smell coming out from your toilet).

लागणारं साहित्य


डिस्पोजेबल बाटली

फॅब्रिक सॉफ्टनर

बेकिंग सोडा

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

लिंबू

पाणी

तयार करण्याची पद्धत

सर्वप्रथम,  एक मध्यम आकाराची डिस्पोजेबल बाटली घ्या. जी फ्लश टँकमध्ये व्यवस्थित उभी राहील. आता या बाटलीमध्ये कोणत्याही प्रकारचे फॅब्रिक सॉफ्टनर घाला. नंतर त्यात एक चमचा बेकिंग सोडा, एक चमचा लिंबाचा रस घालून मिक्स करा. नंतर त्यात एक ग्लास पाणी घालून मिक्स करा. परंतु, बाटली पूर्णपणे पाण्याने भरू नका. आता बाटलीचे झाकण घट्ट बंद करा.

दिवाळीआधी वजन कमी करायचं? फिटनेस कोच सांगतात ७ सोप्या टिप्स; महिनाभरात दिसेल फरक

नंतर एक धारदार स्क्रू ड्रायव्हर घ्या. गॅस चालू करा आणि स्क्रू ड्रायव्हर गरम करा. आता बाटली उलटी करा म्हणजे तळाशी पाणी राहणार नाही आणि नंतर गरम स्क्रू ड्रायव्हरच्या मदतीने बाटलीच्या तळाशी एक छिद्र करा. आता पाण्याच्या टाकीचे झाकण काळजीपूर्वक काढा आणि बाटली सरळ उभी करा. झाकण बंद करा आणि जेव्हा तुम्ही फ्लश कराल तेव्हा टॉयलेट सीट आपोआप स्वच्छ होईल आणि बाथरूममध्ये दुर्गंधी पसरणार नाही.

Web Title: How to prevent smell coming out from your toilet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.