Join us  

घरातील डस्टबीनमधून येते कुबट दुर्गंधी? ५ सोपे उपाय, डस्टबीन वारंवार स्वच्छ करण्याची गरजच नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2024 8:13 AM

How to get rid of smell from dustbin : How To Clean Your Dustbin : रोज वापरुन खराब झालेल्या डस्टबीनमधून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठीचे उपाय...

घरातील एका कोपऱ्यात असणारा छोटासा डस्टबीन ही सर्वात आवश्यक वस्तू आहे. घरातील डस्टबीनमध्ये आपण ओला - सुका असा कोणत्याही प्रकारचा कचरा नियमितपणे टाकत असतो. घरातील केर किंवा किचन स्वच्छ मधील घाण, तसेच उरलेले पदार्थ असे काही ना काही आपण कचऱ्याच्या डब्यांत टाकत असतो. पण यासोबत डस्टबीन वेळोवेळी स्वच्छ करणही तितकचं गरजेच आहे. डस्टबीन योग्य वेळी स्वच्छ केले नाही तर पावसाळ्यात ओलाव्यामुळे त्यातून  येणारी दुर्गंधी त्रासदायक ठरते(How to get rid of smell from dustbin).

घरातील स्वच्छता राखण्यासाठी आपण डस्टबीन ठेवतो पण त्यांना रोज स्वच्छ करायला वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यामध्ये टाकलेला ओला कचरा कुजतो आणि घरभर दुर्गंधी पसरते. आता दुर्गंधीमागील कारण काहीही असले तरी ते संपूर्ण घराचे वातावरण बिघडवते. यासाठीच आपण काही साध्यासोप्या टिप्स वापरुन घरातील डस्टबीन अगदी चुटकीसरशी लगेच स्वच्छ करु शकतो. यामुळे डस्टबीन स्वच्छ तर होईलच पान त्यातून येणारी घाण - कुबट दुर्गंधीही नाहीशी करता येऊ शकते(How To Clean Your Dustbin).

डस्टबीन स्वच्छ करण्यासाठी... 

१. लिंबाची साल :- डस्टबीनचा वास दूर करण्यासाठी लिंबाची साल खूप उपयुक्त आहे. लिंबाच्या साली पाण्यात उकळून या पाण्याने डस्टबीन स्वच्छ करा. आता कचरा फेकण्यापूर्वी लिंबाची साले वाळवून डस्टबीन मध्ये ठेवा. यामुळे दुर्गंधीचा त्रास होणार नाही. त्याचबरोबर आपण लिंबाच्या साली उन्हात वाळवून त्याची पावडर देखील करु शकता. ही पावडर डस्टबीनच्या तळाशी घालावी त्यानंतर त्यात कचरा टाकावा. यामुळे डस्टबीन फारसा घाण होत नाही तसेच त्यातून कुबट दुर्गंधी येत नाही. 

मातीच्या भांड्यात स्वयपाक केला की भांड्यांचा तेलकट वास जात नाही? ८ सोपे उपाय-भांडी चमकतील नव्यासारखी... 

२. बेकिंग पावडर :- बेकिंग पावडरच्या मदतीने तुम्ही डस्टबिन स्वच्छ करू शकता आणि दुर्गंधीपासून मुक्ती मिळवू शकता. जर डस्टबिनला अजिबात वास येऊ नये असे वाटत असेल तर प्रथम त्यात एक कप बेकिंग पावडर त्यात टाका, त्यानंतर कचरा टाकायला सुरुवात करा आणि डस्टबीन भरल्यावर पुन्हा त्यावर बेकिंग पावडर टाका. 

रोज वापरुन स्टीलचे चमचे काळेकुट्ट झाले ? बेकिंग सोडा - व्हिनेगरचा सोपा उपाय, चमचे दिसतील चांदीसारखे लख्ख... 

३. ​​ब्लीचिंग पावडर​ :- ब्लीचिंग पावडरसोबतच इतर रासायनिक क्लिनरचा वापर देखील आपण करु शकतो. यासाठी कचरा डस्टबीनमध्ये टाकण्यापूर्वी त्यावर ब्लीचिंग पावडर शिंपडा. त्यामुळे पावसाळ्यात त्यातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होणार नाही.

४. इसेंन्शियल ऑइल :- डस्टबीनमध्ये खराब झालेला ओला व सुका कचरा मिसळल्याने घरात दुर्गंधी पसरते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आवडत्या इसेंन्शियल ऑइलची मदत घेऊ शकता. यासाठी कापसाचा बोळा घेऊन त्यावर थोडेसे  इसेंन्शियल ऑइल ओतावे  आणि डस्टबीनमध्ये ठेवा. यामुळे डस्टबीनमधून घाण - कुबट दुर्गंधी येण्याचे प्रमाण कमी होईल. 

५. कॅट लिटर​ :- कॅट लिटर दुर्गंधी आणि द्रव पदार्थ शोषून घेतो, त्यामुळे डस्टबीनमधून येणाऱ्या दुर्गंधीचे प्रमाण कमी होऊ शकते. तुम्हाला ते बाजारात सहज मिळेल आणि डब्यामध्ये कचरा टाकण्यापूर्वी तुम्ही कॅट लिटर डस्टबीनमध्ये टाकू शकता. डस्टबीनला सुमारे आठवडाभर दुर्गंधीमुक्त ठेवण्याचे काम कॅट लिटर करते. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स