हल्ली चष्मा, गॉगल वापरणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. काही घरांमध्ये तर प्रत्येकाला चष्मा असतो. शिवाय नियमितपणे गॉगल वापरणारेही आहेतच. पण बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की गॉगल असो किंवा चष्मा असो त्याच्या काचा मात्र खूप लवकर खराब होतात. अगदी काही महिन्यांतच त्यावर इतके स्क्रॅचेस येतात की तो वापरणं अवघड होऊन जातं. हल्ली चष्मा आणि गॉगलच्या काचासुद्धा खूप महाग झाल्या आहेत (how to clean glasses of spects to avoid scratches?). त्यामुळे काही महिन्यांतच त्या बदलण्याचा खर्च अनेकांना परवडण्यासारखा नाही. म्हणूनच चष्मा किंवा गॉगलच्या काचांची काळजी कशी घ्यावी, यासाठी या काही खास टिप्स पाहा..
चष्मा किंवा गॉगलच्या काचांना स्क्रॅचेस पडू नयेत म्हणून उपाय
१. काचा कशा पुसाव्या?
काही मोजके अपवाद सोडले तर बहुतांश जणांची हीच सवय असते की ते चष्मा किंवा गॉगलच्या काचा पुसताना अगदी हाताला येईल तो कपडा घेतात आणि काचा पुसतात. काचांवर स्क्रॅचेस येण्याचं हेच सगळ्यात मुख्य कारण आहे. त्यामुळे ही सवय आधी सोडा.
नव्या भांड्यांवरचे स्टिकर्स अर्धवट निघतात- भांड्याला चिटकून बसतात? २ उपाय, स्टिकर्स झटपट निघतील
चष्मा किंवा गॉगलच्या काचा पुसरण्यासाठी नेहमी त्याच्यासोबत येणारा मायक्रोफायबरचाच कपडा वापरा. असा कपडा तुमच्याकडे नसेल तर मग एखादा होजियरीचा किंवा सुती कपडा ओलसर करून घ्या आणि त्या कपड्याने काचा पुसा. कोरड्या असणाऱ्या होजियरी किंवा सुती कपड्यानेही काचा पुसू नयेत. त्यामुळेही काचांवर स्क्रॅचेस येऊ शकतात.
२. हा उपायही करा..
चष्मा किंवा गॉगलवर जे काही सुक्ष्म स्क्रॅचेस येतात ते काढून टाकण्यासाठी टुथपेस्ट, बेकिंग सोडा हे पदार्थ उपयुक्त ठरतात. एका वाटीमध्ये थेंबभर टुथपेस्ट आणि तेवढाच बेकिंग सोडा घ्या.
रोज नाश्त्याला काय करावं? अत्यंत अवघड प्रश्नाचं घ्या उत्तर, ६ झटपट चविष्ट पदार्थ
दोन्ही व्यवस्थित एकत्र करा आणि ते काचांना लावून काचा स्वच्छ करा. त्यानंतर नळाखाली धरून काचा स्वच्छ करून घ्या. या काचा पुसण्यासाठी पुन्हा ओलसर कपड्याचाच वापर करा. कोरड्या कपड्याने चष्मा किंवा गॉगल पुसणे पुर्णपणे टाळावे.