Lokmat Sakhi >Social Viral > लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत

लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत

Mosquito Repellent Ideas: लहान मुलांना सारखे डास चावतात ना म्हणून हे काही उपाय करून पाहा. डास मुलांना अजिबात चावणार नाहीत (How to protect our children from mosquitos).....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2023 12:06 PM2023-09-26T12:06:06+5:302023-09-26T12:07:25+5:30

Mosquito Repellent Ideas: लहान मुलांना सारखे डास चावतात ना म्हणून हे काही उपाय करून पाहा. डास मुलांना अजिबात चावणार नाहीत (How to protect our children from mosquitos).....

How to protect our children from mosquitos, Home remedies to get rid of mosquitos bite | लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत

लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून ५ उपाय, डास मुलांच्या आजुबाजुला फिरकणारही नाहीत

Highlightsडासांना पळवून लावणारे केमिकल्स सतत घरात लावून ठेवणंही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं वाटतं

पावसाळा सुरू झाला की डासांचे प्रमाण नेहमीपेक्षा जरा जास्तच वाढते. सारखे डास आजूबाजूला फिरताना दिसतात आणि चावतात. आपण मोठी माणसे डासांपासून स्वत:ला सुरक्षित तरी ठेवू शकतो. पण लहान मुले मात्र डासांच्या चावण्याने त्रस्त होतात. काही मुलांच्या अंगावर तर डास चावल्यावर लगेच फोडही येतात. डासांना पळवून लावणारे केमिकल्स सतत घरात लावून ठेवणंही मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचं वाटतं (Mosquito Repellent Ideas). म्हणूनच तर हे काही उपाय करून पाहा (Home remedies to get rid of mosquitos bite). यामुळे डास मुलांच्या आजूबाजूला फिरकणारही नाहीत. (How to protect our children from mosquitos?)

 

लहान मुलांना डास चावू नयेत म्हणून उपाय....

१. यातला सगळ्यात पहिला उपाय म्हणजे मुलांना नेहमी लांब बाह्यांचे शर्ट आणि फुल पॅण्ट घालाव्या.

परिणीती चोप्रानं लग्नात घातलेलं हिऱ्यांचं देखणं 'आयरा' नेकलेस केवढ्याचं असेल? महागड्या दागिन्याची न्यारी गोष्ट...

हा उपाय बहुसंख्य आईंना माहिती आहे. पण मुलांना कपडे घालताना लक्षात घ्या की ते कपडे खूप घट्ट किंवा अंगाला चिटकून असणारे नको. कारण अशा कपड्यांमधून डासांचा दंश शरीराला होऊ शकतो. त्यामुळे कपडे नेहमी सैलसर ठेवा.

२. घरात सकाळ, संध्याकाळ कापूराच्या ३ ते ४ वड्या जाळा. कापूराचा सुगंध डासांना पळवून लावतो.

 

३. एक लिंबू घ्या. ते मधोमध चिरा. लिंबाच्या दोन्ही तुकड्यांवर ६ ते ७ लवंगा खोचा. या लिंबाच्या फोडी लहान मुले खेळत असतील त्या खोलीत ठेवा. लिंबू आणि लवंगच्या वासानेही डास दूर जातात.

गव्हाची पोळी खावी की तीन-चार धान्य एकत्र करुन मल्टीग्रेन पोळी खाणं फायद्याचं? काय टाळलेलंच बरं..

४. सकाळ आणि संध्याकाळ या वेळेत डास घरात येण्याचे प्रमाण जरा जास्त असते. त्यामुळे शक्यतो या दोन्ही वेळेस दरवाजे- खिडक्या बंद ठेवा. 

 

५. मुलांना फिक्या रंगाचे कपडे घाला. कारण डास गडद रंगाकडे लवकर आकर्षित होतात. त्यामुळे मुलांना काळे, चॉकलेटी, लाल असे काळपट गडद रंगाचे कपडे घालू नका. 


 

Web Title: How to protect our children from mosquitos, Home remedies to get rid of mosquitos bite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.