Lokmat Sakhi >Social Viral > रव्यात किडे झालेत? लगेच फेकू नका, ३ उपाय- रवा नक्की वापरता येईल 

रव्यात किडे झालेत? लगेच फेकू नका, ३ उपाय- रवा नक्की वापरता येईल 

Kitchen Tips: रोजच्या धावपळीमुळे अनेक गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही आणि मग त्यामुळे अन्न- धान्य अशा पद्धतीने खराब होतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 03:35 PM2022-10-10T15:35:32+5:302022-10-10T15:36:11+5:30

Kitchen Tips: रोजच्या धावपळीमुळे अनेक गोष्टींकडे लक्ष देणं होत नाही आणि मग त्यामुळे अन्न- धान्य अशा पद्धतीने खराब होतं...

How to protect rava or sooji from bugs or worms? How to store sooji or rava properly? | रव्यात किडे झालेत? लगेच फेकू नका, ३ उपाय- रवा नक्की वापरता येईल 

रव्यात किडे झालेत? लगेच फेकू नका, ३ उपाय- रवा नक्की वापरता येईल 

Highlightsअसं धान्य एकतर वापरावं वाटत नाही आणि महागाईमुळे टाकूनही द्यावं वाटत नाही. म्हणूनच हे काही उपाय करून बघा.

कामाची रोजची गडबड, धावपळ यामुळे अनेकदा घाईघाईने स्वयंपाक उरकताना अन्नधान्यांना ओले हात लागतात. बऱ्यचदा वेळच नसल्याने अन्नपदार्थांकडे पुरेसं लक्ष देणं होत नाही. याचा व्हायचा तोच परिणाम होतो आणि मग रव्यामध्ये किंवा गहू, तांदूळ, डाळी अशा धान्यांमध्ये किडे, अळ्या होतात. असं धान्य एकतर वापरावं वाटत नाही आणि महागाईमुळे टाकूनही द्यावं वाटत नाही. म्हणूनच हे काही उपाय करून बघा. रव्यामध्ये झालेले किडे (How to protect rava or sooji from bugs) निघून जातील आणि रवा स्वच्छ होईल (cleaning tips). 

 

रव्यामधे किडे- अळ्या झाल्यास...
१. ऊन दाखवा

धान्यात किंवा रव्यात किडे, अळ्या झाल्या तर लगेच अशा पदार्थांना थोडं ऊन दाखवा. म्हणजेच उन्हात एखादा कपडा अंथरा आणि त्यावर रवा पसरवून टाका. एक- दोन दिवस रवा कडक उन्हात ठेवला की त्याच्यातले किडे- अळ्या मरून जातात. मग असा रवा चाळून घेतला की स्वच्छ होतो.

 

२. कडूलिंबाची पानं घाला
ज्याप्रमाणे धान्य भरून ठेवताना आपण त्यात कडूलिंबाचा पाला घालतो, त्याचप्रमाणे रव्याच्या बरणीतही कडूलिंबाची पानं घालून ठेवा.

फक्त ४ पदार्थ वापरा, ७ दिवसांत कमी होतील डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सुरकुत्या, दिवाळीत दिसाल फ्रेश

बरणीत सगळ्यात खाली, सगळ्यात वर आणि एक थर बरणीच्या मधोमध घाला. रवा अनेक दिवस चांगला राहिल.

 

३. कापूर
किडे झालेला रवा एक- दोन दिवस उन्हात ठेवा. त्यानंतर तो चाळून बरणीत भरून ठेवा. एका कागदात थोडा कापूर टाकून त्याची पुडी बांधा आणि ही पुडी रव्याच्या बरणीत ठेवून द्या. रव्यात किडे होणार नाहीत. पण या उपायामुळे रव्याला कापूराचा वास लागण्याची शक्यता असते. त्यामुळे तेवढी काळजी मात्र घ्या. 

शुटींग करायचं होतं पोटातल्या बाळाच्या हालचालीचं, पण बघा नेमकं झालं काय, व्हायरल व्हिडिओ

रव्याला किडे लागू नये म्हणून....
१. रवा बरणीत भरून ती बरणी फ्रिजमध्ये ठेवावी. रवा कित्येक दिवस किड न लागता टिकतो.

२. रवा आणल्यावर तो कढईमध्ये टाकून ५ ते ७ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. भाजून घेतलेला रवा पुढचे कित्येक दिवस चांगला टिकतो. 

 

Web Title: How to protect rava or sooji from bugs or worms? How to store sooji or rava properly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.