स्वयंपाकाचा गॅस ही आपल्या जिवनावश्यक गरजांपैकी एक गरज आहे (Gas Cylinder). पूर्वी चूल आणि स्टोव्ह यांचा वापर अधिक प्रमाणात करण्यात यायचा. पण आजकाल गॅसशिवाय पर्याय नाही. शेगडी व्यतिरिक्त काही लोक इंडक्शन गॅसचा वापर करतात. शेगडी चालू करण्यासाठी सिलिंडरचा वापर होतो.
दिवसभरात आपण शेगडीवर अन्न शिजवतो (Kitchen Tips). ज्यामुळे सिलेंडरमधील गॅस लवकर संपतो. काही वेळेला १५ दिवस किंवा महिनाभराच्या आत सिलेंडरमधील गॅस संपते. ज्यामुळे महिन्याचे बजेट कोलमंडते. गॅसला सध्या दुसरा कोणता चांगला पर्याय नसल्याने स्वयंपाकासाठी त्याचा वापर अनिवार्यच आहे. पण गॅसची बचत कशी करायची? स्वयंपाक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? पाहूयात(How to Reduce Monthly Gas Bills at Home).
स्वयंपाक करताना गॅसची बचत कशी करावी?
अन्न झाकण झाकून शिजवा
काही लोक अन्न झाकून शिजवत नाही. ज्यामुळे अन्न शिजण्यासाठी अधिक वेळ घेते. काही वेळेस आपल्याला पदार्थ तयार करताना काही गोष्टी घालायच्या असतात. अशावेळी आपण त्यावर झाकण ठेवत नाही. मात्र, अशामुळे गॅसचा वापर जास्त होतो. त्यामुळे अन्न नेहमी झाकून शिजवायला हवे. झाकून शिजवल्याने अन्न लगेच शिजते.
कोपर - गुडघ्यांचा काळेपणा वाढतच चालला आहे? दह्यात मिसळा २ गोष्टी; तज्ज्ञ सांगतात दिसेल फरक
प्रेशर कुकरचा वापर करा
प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजण्यास मदत होते, आणि गॅसचा वापर कमी होतो. प्रेशर कुकरमध्ये डाळी, तांदूळ आणि भाज्या लवकर शिजतात. यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि वेळेची देखील बचत होते.
स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य तयार करा
काही लोक गॅसवर कढई ठेवल्यानंतर पदार्थाला लागणाऱ्या गोष्टींची तयारी करतात. पण असं केल्याने गॅस उगाच वाया जात असतो. त्यामुळे स्वयंपाक करण्यापूर्वी साहित्य कापून, चिरून ठेवा. ज्यामुळे स्वयंपाक लवकर होईल. मेहनत न घेता, कमी गॅसमध्ये, कमी वेळात स्वयंपाक तयार होईल.
मंद आचेवर शिजवा
अन्नाला उकळी आली की गॅस कमी करून मंद आचेवर शिजवा. यामुळे गॅसची बचत होते. शिवाय अन्न व्यवस्थित शिजते. पण बारीक गॅसवर अन्न शिजवू नका. गॅसची आच मंद ठेवल्याने पदार्थ शिजण्यास अधिक वेळ जातो. त्यामुळे अन्न नेहमी मध्यम आचेवर शिजवा.
मेंदू करेल सुपरफास्ट काम-येईल तरतरी! बाबा रामदेव सांगतात भिजवलेल्या बदामासोबत खा ३ गोष्टी
गॅस बर्नर तपासा
गॅस बर्नर वेळच्या वेळी तपासा. अनेकदा बर्नरमध्ये घाण अडक्डते. अस्वच्छ गॅस बर्नरमुळे गॅस मोठा केला तरीही तो बारीकच राहतो. किंवा काही वेळा गॅसची फ्लेम इतकी मोठी होते की ती भांड्याच्या बाजूने बाहेर येते. अशावेळी गॅस वाया जातो. त्यामुळे महिन्याला बर्नर स्वच्छ करत राहा.