Lokmat Sakhi >Social Viral > दिवसभरात काहीवेळ फ्रिज बंद ठेवल्यास लाईटबील कमी येतं? की फ्रिज बिघडतं, नक्की खरं काय?

दिवसभरात काहीवेळ फ्रिज बंद ठेवल्यास लाईटबील कमी येतं? की फ्रिज बिघडतं, नक्की खरं काय?

How to reduce the power consumption of refrigerator : दिवसभरातून काहीवेळ फ्रिज बंद केल्यास लाईटबील कमी येतं? खर्च वाचवण्यासाठी माहीत करून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 08:35 AM2023-07-29T08:35:00+5:302023-07-29T12:44:14+5:30

How to reduce the power consumption of refrigerator : दिवसभरातून काहीवेळ फ्रिज बंद केल्यास लाईटबील कमी येतं? खर्च वाचवण्यासाठी माहीत करून घ्या

How to reduce the power consumption of refrigerator | दिवसभरात काहीवेळ फ्रिज बंद ठेवल्यास लाईटबील कमी येतं? की फ्रिज बिघडतं, नक्की खरं काय?

दिवसभरात काहीवेळ फ्रिज बंद ठेवल्यास लाईटबील कमी येतं? की फ्रिज बिघडतं, नक्की खरं काय?

रेफ्रिजरेटरचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो. पण फ्रिजसंबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची लोकांना माहिती नसते. अनेकांना फ्रिज  ऑन-ऑफ करण्याची सवय असते. काहीजण दिवसभरात काही तास फ्रिज बंद ठेवतात. तर काहीजण महिनोंमहिने फ्रिज बंद करत नाहीत. कायम सुरू ठेवतात. (Ways to improve your refrigerator's energy efficiency)

बाहेरगावी जाताना  अनेकांच्या घरी महिनाभर फ्रिज बंद ठेवला जातो. रेफ्रिजरेटर किती तासांसाठी ऑन-ऑफ करायचा याबाबत लोकांना माहिती नसते. रेफ्रिजरेटर बंद ठेवल्यानं लाईटबील कमी येईल किंवा फ्रिज लवकर खराब होणार नाही असा लोकांचा समज असतो. (How to save electricity using refrigerator)

जर तुम्ही रोज १ ते २ तासांसाठी किंवा आठवडाभर रेफ्रिजरेटर बंद करत असाल आणि त्यामुळे  लाईटबील कमी येईल असं तुम्हालला वाटत असेल तर हा तुमचा गैससमज आहे. साधारपणपणे पूर्ण वर्षभर रेफ्रिजरेटर सुरू ठेवलं आणि काही तासांसाठी ऑफ केले नाही तरीही तुम्ही वीज वाचवू शकता. (How to reduce the power consumption of refrigerator) रेफ्रिजरेटर ऑटोमॅटिक कुलिंग करते. यात असलेले टेम्प्रेचर सेंसरला कळते की कधी पॉवर कट करायची आहे. यामुळे ते अंधाधूंध पद्धतीनं कुलिंग करत नाही. गरज पडल्यानंतर पॉवर ऑफ असतं. यामुळे वीज वाचवता येते.

दररोज काही तासांसाठी तुम्ही रेफ्रिजरेटर बंद करत असाल आणि तुम्हाला असे वाटते की यामुळे तुम्ही खूप वीज वाचवत आहात, तर तुम्ही पूर्णपणे चुकीचे आहात. जर तुम्हाला हवे असेल, तर तुम्ही साफसफाईसाठी काही तासांसाठी ते नक्कीच बंद करू शकता, परंतु कायम फ्रिज बंद करून वीज वाचवण्याच्या कल्पनेचा तुम्हाला फारसा उपयोग होणार नाही. रेफ्रिजरेटरचे कूलिंग एटजस्ट केल्यावर वीज बिल कमी होऊ शकते.

वीज वाचवण्यासाठी तुम्ही जर तुम्ही 5 स्टार रेटेड रेफ्रिजरेटर विकत घेतला तर तुमच्यासाठी हा एक चांगला फायदा होईल. रेफ्रिजरेटर पूर्णपणे भरू नका, यामुळे रेफ्रिजरेटरमधील थंड हवेचा प्रवाह कमी होऊ लागतो, ज्यामुळे रेफ्रिजरेटरची क्षमता कमी होते. फ्रीजमध्ये पुरेशी जागा असेल तर त्यामुळे फ्रीजची थंड करण्याची क्षमताही वाढते.

Web Title: How to reduce the power consumption of refrigerator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.