Lokmat Sakhi >Social Viral > बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

Tips For Bad Smell From Shoes: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या हमखास जाणवते. त्यामुळेच बुटांचा हा त्रास कमी करण्यासाठी हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2023 09:16 AM2023-08-15T09:16:37+5:302023-08-15T09:20:02+5:30

Tips For Bad Smell From Shoes: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ही समस्या हमखास जाणवते. त्यामुळेच बुटांचा हा त्रास कमी करण्यासाठी हे काही सोपे, घरगुती उपाय करून बघा..

How to remove bad smell from shoes? How to keep footwear clean and fresh during monsoon  | बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

बूट ओलसर राहिल्याने कुबट वास येतो? ३ उपाय, बुटांमधली दुर्गंधी होईल गायब

Highlightsकुबट, घाण वासाचे बूट पायात घालावेही वाटत नाहीत. म्हणूनच बुटांमधला कुबट वास निघून जाण्यासाठी हे काही उपाय करून बघा.

पावसाळ्याच्या दिवसात (rainy days) बूट ओलसर राहतात. त्यामुळे हळूहळू मग त्यांच्यातून दुर्गंधी येऊ लागते (bad smell from shoes). बूट वाळले तरी त्यांच्यातला दुर्गंध काही कमी होत नाही. घरात बुटांचे एक- दोन जास्तीचे जोड असतील तर ठीक. पण नसतील तर मात्र पंचाईत होते. शाळेत जाणारी मुलं असतील तर त्यांच्या बाबतीत हमखास ही अडचण येते. असे कुबट, घाण वासाचे बूट पायात घालावेही वाटत नाहीत. म्हणूनच बुटांमधला कुबट वास निघून जाण्यासाठी हे काही उपाय करून बघा.(How to keep footwear clean and fresh during monsoon)

 

बुटांमधला कुबट वास घालविण्यासाठी  उपाय
१. कापुराचा वापर

सगळ्यात सोपा आणि अगदी स्वस्तातला उपाय म्हणजे बुटांमध्ये कापूर घालून ठेवणे. हा उपाय करण्यासाठी कापुराच्या ३ ते ४ गोळ्या घ्या आणि त्या एका छोट्या आकाराच्या सुती कपड्यामध्ये गुंडाळा.

केसांत खूपच कोंडा झाला, खूप गळतात? करा आजी- आई करायच्या तो जास्वंदाचा खास उपाय

त्यानंतर अशी एकेक पुरचुंडी दोन्ही बुटांमध्ये रात्रभर ठेवून द्या. वास कमी होईल.

 

२. ग्रीन टी
कापुराप्रमाणेच बुटांमधला दुर्गंध घालवण्यासाठी ग्रीन टी उपयुक्त ठरतो. यासाठी ग्रीन टी ची बॅग बुटामध्ये घालून ठेवा.

सालांसह करा लिंबाची चटपटीत झटपट चटणी, महिनाभर टिकेल- फायदेही भरपूर

४ ते ५ तास ही बॅग बुटांमध्ये ठेवली तरीही दुर्गंध कमी होण्यास मदत होईल. सकाळी लवकर बाहेर जावे लागत असल्यास रात्रीच ग्रीन टी बॅग बुटांमध्ये घालून ठेवा.

 

३. बॉडी स्प्रे किंवा टाल्कम पावडर
या दोन्हीपैकी एक काहीतरी बुटांमध्ये स्प्रे करून ठेवा.

पांढरी साडी अंगावर खुलतच नाही? ५ टिप्स, मेकअप- ज्वेलरीमधे करा छोटासा बदल- दिसा खूप सुंदर

तुम्ही जेव्हा बूट घालणार असाल त्याच्या साधारण एक ते दीड तास आधी त्यामध्ये टाल्कम पावडर टाकून ठेवा किंवा एखादा हेवी बॉडी स्प्रे मारून ठेवा. दुर्गंध निघून जाईल आणि फ्रेश वाटेल. 

 

Web Title: How to remove bad smell from shoes? How to keep footwear clean and fresh during monsoon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.