Join us  

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना कुबट वास येतो? ३ उपाय करा- न धुता पांघरुणं होतील स्वच्छ- सुगंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 4:07 PM

Remedies To Get Rid Of Musty Smell From Clothes: कपडे धुण्यासाठी वेळ नसेल तर हे काही उपाय करून पाहा. न धुताही त्यांच्यातला कुबट वास निघून जाईल आणि ते फ्रेश होतील.

ठळक मुद्देकपड्यांना ठेवणीतला कुबट वास येत असेल तर तो काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा. न धुताही कपडे सुगंधी- फ्रेश होऊन जातील.

एरवी आपल्याला खूप पांघरुणं लागत नाहीत. त्यामुळे मग गरजेपुरती आपण वर ठेवतो आणि बाकी सगळी दिवाणच्या बॉक्समध्ये नाहीतर कपाटात भरून ठेवतो. हिवाळ्याचा कडाका वाढला की मग मात्र या पांघरुणांची गरज भासते. त्यामुळे आता थंडीचा कडाका वाढू लागल्याने अनेक घरांमधली ठेवणीतली अंधरुणं- पांघरुणं बाहेर येऊ लागली आहेत. सध्या काही ठिकाणी पाऊस आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे हे कपडे काही धुता येत नाहीत. अशा वातावरणात या कपड्यांना ठेवणीतला कुबट वास येत असेल तर तो काढून टाकण्यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा (Remedies To Get Rid Of Musty Smell From Clothes). न धुताही कपडे सुगंधी- फ्रेश होऊन जातील. (How to remove bad smell or odour from blankets and chadar without washing it)

ठेवणीतल्या ब्लँकेट्स- चादरींना येणारा दुर्गंध घालविण्याचे उपाय

 

१. घरात पसरून ठेवा

सध्या काही ठिकाणी खूप ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी पाऊस आहे. ज्याठिकाणी अशी परिस्थिती आहे, त्यांनी एका खोलीत पांघरुणाची पुर्ण घडी उकलून ते पसरवून ठेवावं. खोलीतला पंखा चालू ठेवावा.

हिवाळ्यात आऊटिंगसाठी करता येतील असे ७ स्टायलिश विंटर लूक- दिसाल एकदम कॅची- आकर्षक

रात्रभर जरी अशा पद्धतीने पांघरुण ठेवलं तरी त्याचा कुबट वास निघून जाईल. ज्याठिकाणी चांगलं कडक ऊन आहे, त्यांनी हे कपडे दिवसभर उन्हात वाळवत ठेवावे. कपड्यांचा दुर्गंध पुर्णपणे निघून जाईल. 

 

२. कापूर

कपड्यांचा दुर्गंध घालविण्यासाठी कापुराचाही खूप चांगला उपयोग होतो.

बिना पाकाचे झटपट तयार होणारे पौष्टिक डिंक लाडू, महागड्या सुकामेव्याचीही गरज नाही- पाहा सोपी रेसिपी

यासाठी आधी पांघरुण वर सांगितल्याप्रमाणे घडी मोडून ठेवा. त्यानंतर त्या पांघरुणाच्या कोपऱ्यांवर, कडेकडेने कापूर चोळून लावा. यामुळे कपड्यांचा दुर्गंध जाईल. 

 

३. सुगंधित पदार्थांचा उपयोग

कपड्यांचा दुर्गंध घालविण्यासाठी बॉडी स्प्रे, परफ्यूम, उदबत्ती, डांबरगोळी या पदार्थांचाही वापर करता येईल.

थंडीत ओठ फुटतात- भेगा पडून रक्त येतं? ओठांना मऊ ठेवणारं ‘हे’ लिपबाम वापरून पाहा... 

त्यासाठी कागदावर उदबत्ती किंवा डांबरगोळी ठेवा आणि तसे कागद त्या कपड्यांवर ठिकठिकाणी ठेवा. ६- ७ तास अशा पद्धतीने ठेवले तरी कपड्यांना डांबरगोळीचा किंवा उदबत्तीचा सुगंधी वास लागेल.  

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलहोम रेमेडी