Join us  

बुंदके आल्याने कपडे जुने दिसतात? ४ उपाय- स्वेटर-जॅकेटही दिसेल नव्यासारखं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2024 12:27 PM

Home Hacks To Remove Lint Balls On Clothes: कपड्यांवर बुंदके किंवा गोळे येऊ नये म्हणून काय करावं किंवा गोळे आले असतील तर ते काढून टाकण्यासाठी काय करावं, हे आता पाहूया... (How to remove bobbles or bundake on clothes in marathi)

ठळक मुद्देहिवाळ्यात आपण जे जॅकेट वापरतो, त्यावर तर हमखास असे गोळे येतात. यामुळे मग नवे कपडेही अगदी जुन्यासारखे वाटू लागतात

बऱ्याचदा असं होतं की नवे कपडे आपण २ ते ३ वेळा धुतले तरी त्याच्यावर लगेच बुंदके किंवा गोळे येतात. खासकरून हिवाळ्यात आपण जे जॅकेट वापरतो, त्यावर तर हमखास असे गोळे येतात. यामुळे मग नवे कपडेही अगदी जुन्यासारखे वाटू लागतात (Home hacks to remove lint balls on clothes) कपड्यांवर अशा पद्धतीने गोळे किंवा बुंदके येऊ नये, किंवा ते आले असतील तर मग काढून टाकण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावे, हे आता पाहूया.. (How to remove bobbles or bundake on clothes in marathi)

 

कपड्यांवर बुंदके किंवा गोळे येऊ नये म्हणून उपाय

१. कपड्यांवर बुंदके किंवा गोळे येऊ नये यासाठी कपडे नेहमी सॉफ्ट डिटर्जंट पावडरने धुवावे. हार्ड साबण किंवा डिटर्जंटने कपडे धुतल्यास त्यावर बुंदके येण्याची शक्यता खूप जास्त असते.

२. ज्या कपड्यांवर बुंदके किंवा गोळे येतात, अशा कपड्यांसाठी लिक्विड सोप वापरणे अधिक चांगले किंवा अंगाचा साबण वापरून असे कपडे धुवावे. 

३. कपडे जोरजाेरात आपटू नयेत किंवा ब्रशने जोरजोरात घासून धुवू नयेत.

 

कपड्यांवर आलेले बुंदके किंवा गोळे काढून टाकण्याचे उपाय

१. कपड्यांवर बुंदके किंवा गोळे आले असतील तर ते काढून टाकण्यासाठी बाजारात लिंट रिमुव्हर मिळतात. त्याचा वापर करूनही कपड्यांवरचे गोळे काढून टाकता येतात. ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते खरेदी करू शकता. पण त्यासाठी जास्त पैसे खर्च करायचे नसतील, तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा.

२. भांडे घासण्यासाठी जो स्क्रब असतो, तो वापरूनही कपड्यांवरचे बुंदके काढून टाकता येतात. त्यासाठी स्क्रब हलक्या हाताने  एकाच दिशेने कपड्यांवर फिरवावा.

३. कंगव्याचा वापर करूनही कपड्यांवरचे बुंदके काढून टाकता येतात. त्यासाठी केसांतून जसा कंगवा फिरवतो, तसा तो कपड्यांवरून फिरवावा.

४. कपड्यांवरचे बुंदके काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनही उपयुक्त ठरताे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलहोम रेमेडीस्वच्छता टिप्स