Lokmat Sakhi >Social Viral > जळालेला कुकर २ मिनिटांत होईल चकचकीत; ३ ट्रिक्स, हात न दुखता-न रगडता कुकर होईल स्वच्छ

जळालेला कुकर २ मिनिटांत होईल चकचकीत; ३ ट्रिक्स, हात न दुखता-न रगडता कुकर होईल स्वच्छ

How to remove burnt stains from the pressure cooker : कुकर स्वच्छ करणं एका मोठ्या टास्कप्रमाणे वाटू लागतं. अनेकदा प्रयत्न करूनही कुकर आधीसारखा चमकदार दिसत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 01:18 PM2023-08-18T13:18:37+5:302023-08-19T12:57:18+5:30

How to remove burnt stains from the pressure cooker : कुकर स्वच्छ करणं एका मोठ्या टास्कप्रमाणे वाटू लागतं. अनेकदा प्रयत्न करूनही कुकर आधीसारखा चमकदार दिसत नाही

How to remove burnt stains from the pressure cooker : How to clean burnt cooker easy solution | जळालेला कुकर २ मिनिटांत होईल चकचकीत; ३ ट्रिक्स, हात न दुखता-न रगडता कुकर होईल स्वच्छ

जळालेला कुकर २ मिनिटांत होईल चकचकीत; ३ ट्रिक्स, हात न दुखता-न रगडता कुकर होईल स्वच्छ

कुकरमध्ये बनवलेलं जेवण खाली चिकटलं असेल तर कुकर स्वच्छ करणं कठीण होतं. जळायचा वासही येतो. प्रेशर कुकरमध्ये जेवण बनवताना अनेकदा भात, खिचडी असे पदार्थ तळाशी चिकटतात. यामुळे फक्त जेवणाची चव बिघडत नाही तर कुकरसुद्धा काळा पडतो. (Cleaning Hacks) कुकर स्वच्छ करणं एका मोठ्या टास्कप्रमाणे वाटू लागतं. अनेकदा प्रयत्न करूनही कुकर आधीसारखा चमकदार दिसत नाही. तुम्हालाही अशाच प्रसंगांचा सामना करावा लागत असेल तर काही सोपे उपाय करून तुम्ही भांडी चमकवू शकता. (How to clean burnt cooker)

मीठ आणि तेलाचा वापर

कुकर स्वच्छ करण्याासाठी तुम्ही तेल आणि मीठाचा वापर करू शकता. कारण तेल जळालेला भाग सहज स्वच्छ करते. कुकर स्वच्छ करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे नारळाचं तेल आणि २ चमचे मीठ घालून व्यवस्थित मिसळा. हे मिश्रण कुकरमध्ये घाला आणि चमच्याच्या मदतीनं काळा भाग काढून टाका. हा उपाय करण्यासाठी तुम्ही दगडाचा वापरही करू शकता.  

भांडी घासण्याचा स्क्रबसुद्धा कुकर व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. त्यासाठी  सगळ्यात आधी गरम पाणी घालून १० ते १५ मिनिटांसाठी कुकर ठेवा. नंतर कुकर स्वच्छ पाण्याने धुवा. या उपायानं कुकर चमकू लागेल. तरीही कुकर स्वच्छ होत नसेल तर त्यात पाणी घालून कुकर गॅसवर ठेवा आणि ५ मिनिटांसाठी शिजवून घ्या.

कॉर्न फ्लोअर आणि मीठ

यासाठी कुकर पाण्याने अर्धा भरा. त्यात ४ चमचे कॉर्न फ्लोर घाला. नंतर १० ते १५ मिनिटं उकळून घ्या. जेव्हा कुकर थंड होईल तेव्हा मीठ आणि डिश वॉशनं धुवून घ्या. 

कोक आणि मीठ

कुकर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोक आणि मीठाचा वापर करू शकता. यासाठी जास्त काही करावं लागणार नाही. सगळ्यात आधी कुकरमध्ये एक बाटली कोक आणि अर्धा कप मीठ घाला.  त्यानंतर व्यवस्थित मिसळून कुकर ५ मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या. नंतर कुकर स्क्रबने व्यवस्थित स्वच्छ करा. या उपायाने कुकर नव्यासारखा स्वच्छ होईल.

Web Title: How to remove burnt stains from the pressure cooker : How to clean burnt cooker easy solution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.