Join us  

कितीही साफसफाई केली तरी घरात झुरळं होतातच? ३ सोपे उपाय झुरळं होतील गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2023 11:19 AM

How To Remove Cockroaches From Home Easy Home Remedies : झुरळांचा बंदोबस्त करण्याच्या सोप्या टिप्स

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत झुरळं दिसायला सुरुवात होते. थंडावा शोधण्यासाठी ही झुरळं पाण्याच्या आसपास, फ्रिजच्या जवळपास फिरत राहतात. कितीही साफसफाई केली तरी ट्रॉलीमध्ये किंवा अगदी ओट्यावर फिरणारी झुरळं पाहून आपल्याला नकोसं वाटतं. सिंकच्या खाली तर कधी भांड्यांमधून फिरणारी ही झुरळं सुरुवातीला २ किंवा ४ इतक्या संख्येत असणाऱ्या या झुरळांची संख्या काही दिवसांत अचानक त्यांची अंडी दिसतात आणि ती वाढतच जातात. अशावेळी ओटा, किचन कितीही साफ केलं तरी ही झुरळं काही जायचं नाव घेत नाहीत. खाण्या-पिण्याच्या गोष्टींवर झुरळांचा वावर असेल तर आरोग्यासाठी ते अतिशय धोकादायक असतं. या झुरळांचा बंदोबस्त कसा करायचा यासाठी घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय पाहूया (How To Remove Cockroaches From Home Easy Home Remedies)...

१. तमालपत्र

पदार्थाला स्वाद आणणारा मसाल्यामधील हा पदार्थ आरोग्यासाठी तर फायदेशीर असतोच. पण झुरळं घालवण्यासाठीही तो उपयुक्त ठरतो. २ ते ३ तमालपत्रांची पूड करुन ती झुरळं फिरतात त्याठिकाणी टाकल्यास उग्र वासाने झुरळं घरातून निघून जाण्यास मदत होते. 

२. कॉफी 

कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. हे कॅफिन झुरळांना त्रासदायक असते, त्यामुळे झुरळांची हालचाल कमी होते. म्हणून घरात खूप जास्त झुरळं झाली असतील तर कॉफी पावडरच्या लहान लहान पुड्या करुन स्वयंपाकघरात ठेवा. पुड्या न करता नुसती कॉफी पावडर टाकली तरी काही दिवसातच झुरळं गायब होतील.

३. बोरीक पावडर 

बोरीक पावडर हा झुरळांना पळवून लावण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. बोरीक पावडरमध्ये थोडी साखर घालून हे मिश्रण घरात झुरळं असणाऱ्या ठिकाणी ठेवावे. साखरेमुळे झुरळं ही पावडर खातात आणि मरतात. यासाठी ३: १ या प्रमाणात बोरीक पावडर आणि साखर घ्यावी. रात्री झोपताना ही पावडर घातली तर सकाळी झुरळं मेलेली दिसतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्सकिचन टिप्स