Join us  

घरात बारीक बारीक झुरळांचा सुळसुळाट झालाय? करा फक्त १ उपाय, झुरळं कायमची घराबाहेर पळतील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 9:57 AM

How to Remove Cockroaches from Home (Cockroach kaise khatam kare) : झुरळांनी स्पर्श केलेले अन्न खाल्ल्यास एलर्जी रॅशेज, डोळ्यातून पाणी येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

किचनमध्ये खरकटं पडलं असेल किंवा घरात कुठेही अन्नाचे कण पडले असतील तर लगेच झुरळांचा वावर वाढतो. एक झुरळ घरात शिरले की त्यामागोमाग लहान लहान झुरळं तयार होतात. किचन ट्रॉली, गॅसच्या खाली,  कचऱ्याच्या डब्याजवळ हे किटक जास्त दिसून येतात. (How To Get Rid Of Cockroaches In Your Home) .झुरळांना पळवून लावण्यासाठी केमिकल्सयुक्त स्प्रे लावल्यास अनेकांना त्या स्प्रे च्या वासाने  एलर्जी होते. अशावेळी काही घरगुती उपाय तुमचं काम अधिक सोपं करू शकतात. (How to Remove Cockroaches from Home)

झुरळांचा घरातील वावर वाढल्यास काय होऊ शकते?

झुरळांमुळे फूड पॉयजिंगचा धोका असतो. यामुळे टायफाईडचा आजारही होऊ शकतो. याव्यितरिक्त झुरळांनी स्पर्श केलेले अन्न खाल्ल्यास एलर्जी रॅशेज, डोळ्यातून पाणी येणं यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी  काही टिप्स फायदेशीर ठरू शकतात. 

झुरळांना कसं पळवून लावायचं?

घरातील झुरळांना पळवून लावण्यासाठी सगळ्यात आधी एका वाटीत काळी मिरी घ्या.  व्यवस्थित बारीक करून काळी मिरीची पावडर बनवून घ्या. त्यात कापूर घालून बारीक करून घ्या. नंतर त्यात टुथपेस्ट आणि टॅल्कम पावडर घाला मग त्यात एक लसूण किसून घाला. मग  हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. 

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

त्यानंतर घराच्या कोपऱ्यात, खिडक्यांजवळ, दरवाज्यांजवळ, किचनच्या कोपऱ्यात चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण लावा. यात मिश्रणात वापरलेल्या पदार्थांच्या तीव्र वासाने झुरळं घराबाहेर पडतील. एकही झुरळ घरात दिसणार नाही.

कमी वेळात चांगला परिणाम हवा असल्यास हा उत्तम उपाय आहे. यासाठी तुम्हाला जास्त खर्चही करावा लागणार नाही. हा केमिकल्सयुक्त उत्पादनांचा वापर करावा लागणार. पाली, मुंग्यांना दूर ठेवण्यासाठीसुद्धा तुम्ही या उपायांचा वापर करू शकता.

केस खूप लवकर पिकायला लागले? मेहेंदी लावताना हा पदार्थ घाला, ३ महिने केस राहतील काळे

कडुलिंब

कडुलिंबाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. झुरळांच्या त्रासापासूनसुटका मिळवण्यासाठी कडुलिंबाची पानं फायदेशीर ठरतात. कारण यातील किटकनाशक गुणधर्म गुणकारी ठरतात. यासाठी तुम्ही कडुलिंबाचे तेल किंवा या पावडरचा वापर करू शकता. ज्या ठिकाणी झुरळं लपतात त्या ठिकाणी रात्री झोपण्याच्या आधी या तेलाचा फवारा करा. याच्या वासाने झुरळं लांब राहतील.

टॅग्स :हेल्थ टिप्ससोशल व्हायरलआरोग्य