हिवाळ्यात थंडी पासून बचाव करण्यासाठी आपण ऊनी किंवा लोकरीचे उबदार कपडे वापरतो. या उबदार कपड्यांमध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी अशा अनेक प्रकारचे कपडे असतात. एरवी वर्षभर हे कपडे (How To Remove Dust Without Washing From Woolen Clothes) आपण पॅकिंग करुन कपाटात ठेवून देतो परंतु हिवाळ्यात त्याचा तितकाच जास्त वापर देखील केला जातो. थंडीच्या दिवसांत असे उबदार कपडे सतत वापरुन मळके होतात(How to Get Rid of Dust Particles from Woolen Clothes).
एका ठराविक काळानंतर हे उबदार कपडे मळके, अस्वच्छ आणि घाणेरडे दिसतात. असे उबदारर कपडे रोज वापरल्याने त्यात धूळ, माती अडकून राहते. यामुळे कितीही नवीन असले तरीही हे कपडे मळके दिसतात. हे उबदार कपडे नाजूक लोकरीच्या धाग्यांपासून तयार केलेले असतात. त्यामुळे आपण असे कपडे वारंवार इतर कपड्यांप्रमाणेच धुवू शकत नाहीत. अशावेळी हे उबदार कपडे वारंवार न धुता एक सोपी ट्रिक वापरुन फारशी मेहेनत न घेता झटपट स्वच्छ करु शकतो. थंडीच्या दिवसांत वापरुन मळलेले उबदार कपडे पाण्याशिवाय धुण्याची एक सोपी आणि झटपट ट्रिक. ही ट्रिक वापरुन आपण उबदार कपडे अगदी मिनिटभरात स्वच्छ करु शकता (How To Remove Dust From Woolen Clothes Without Washing).
मफलर, कानटोपी न धुताच स्वच्छ करण्याची सोपी भन्नाट ट्रिक :-
मफलर, कानटोपी, स्वेटर असे उबदार कपडे हिवाळ्यात धुवायचे म्हटल्यावर ते वातावरणातील गारठ्यामुळे लगेच सुकत नाहीत. अशावेळी ते कपडे थोडे जरी ओलसर राहिले तरी त्याला कुबट दुर्गंधी येऊ शकते. अशावेळी आपण हे उबदार कपडे पाण्याने न धुता देखील स्वच्छ करू शकतो, यासाठी आपल्याला बेबी पावडर, एक लहान ब्रश आणि सुती कापड इतके साहित्य लागणार आहे.
पदार्थ तळताना घरभर धूर होतो? पाहा ४ ट्रिक्स, धूर न होता पदार्थ होतील पटकन तळून...
सगळ्यांत आधी उबदार कपडे उलटे करून घ्यावे म्हणजेच आतली बाजू बाहेर करून घ्यावी. त्यानंतर या कपड्यांवर बेबी पावडर शिंपडावी. आपण बेबी पावडर ऐवजी कॉर्नस्टार्च देखील वापरु शकता.
बेबी पावडर शिंपडल्यावर ब्रशच्या मदतीने तो भाग हलकेच घासून घ्यावा. ही बेबी पावडर पावडर कपड्यामधील ओलावा आणि घाण काढून टाकण्याचे काम करते, ज्यामुळे ते न धुता देखील साफ करता येते.