घराची साफ सफाई आपण प्रत्येक जण करतो (Cleaning Tips). भांडी, कपडे यासह फरशी देखील नियमित पुसतो. पण नियमित फरशी पुसूनही फरशीवरचे डाग आणि बॅक्टेरिया निघत नाही (Mopping Floor). फरशीवर आपण चालतो, जर लहान मुल घरात असेल आणि ते रांगत असेल तर, फरशीवरचे किटाणू त्याच्या पोटात जाऊ शकतात. त्यामुळे नियमित फरशी पुसणे गरजेचं आहे.
फरशी आपण साधारण पाण्याने पुसतो. किंवा त्यात केमिकल रासायनिक प्रॉडक्ट टाकून फरशी पुसून घेतो. पण रासायनिक उत्पादने देखील घातक असतात. जर फरशीचे डाग रासायनिक उत्पादनाचा वापर न करता पुसायची असेल तर, पाण्यात होममेड क्लीनर मिक्स करा. यामुळे फरशी व्यवस्थित पुसली जाईल. आणि हट्टी डागही गायब होतील(How To Remove Even The Toughest Stains From A Tile Floor).
घरात तयार करा होममेड फ्लोअर क्लीनर
बेकिंग सोडा
मीठ
मुलींना घरात कोंडून घालण्यापेक्षा आईबाबांनी त्यांना शिकवायला हव्या ५ गोष्टी; मुलगी होईल खंबीर..
कोमट पाणी
अशा पद्धतीने तयार करा फ्लोअर क्लीनर
- फरशीवरचे हट्टी डाग काढण्यासाठी आपण घरगुती स्प्रे तयार करू शकता. यासाठी एका बाऊलमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात बेकिंग सोडा, मीठ घालून मिक्स करा.
मासिक पाळी येतच नाही दोन दोन महिने? जीवनशैलीत आजच करा ५ बदल; पीरियड्स येतील वेळेवर
- काही वेळ मिश्रण तसेच ठेवा. नंतर पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. ज्या ठिकाणी हट्टी डाग असतील, त्या ठिकाणी स्प्रे करा आणि स्क्रबरने घासून हट्टी डाग काढा. काही वेळानंतर ओल्या कापडाने फरशी पुसून घ्या. अशा प्रकारे फरशीवरील हट्टी डाग दूर होतील.
- आपण या स्प्रेचा वापर मार्बलवरही करू शकता. जर घरात मार्बलची फरशी असेल तर, त्यावर हा तयार स्प्रे करा. काही वेळानंतर फरशी पुसा. फरशी नव्यासारखी चमकेल.