Lokmat Sakhi >Social Viral > हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं

हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं

How To Remove Garlic Skin Quickly : जर लसूण सोलायला तुम्हाला खूपच  त्रास होत असेस तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 06:55 PM2024-03-19T18:55:17+5:302024-03-19T19:10:08+5:30

How To Remove Garlic Skin Quickly : जर लसूण सोलायला तुम्हाला खूपच  त्रास होत असेस तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता.

How To Remove Garlic Skin Quickly : How To Peel Garlic Fast Kitchen Hacks | हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं

हात न लावता ५ मिनिटांत सोला किलोभर लसूण; 3 जबरदस्त ट्रिक्स, किचकट काम होईल सोपं

स्वंयपाकाची चव वाढवण्यासाठी लसणाचा वापर केला जातो. कारण लसूण खाल्ल्याने फक्त जेवणाची चव वाढत नाही तर तब्येतीलाही अनेक फायदे मिळतात. (How To Remove Garlic Skin Quickly) अनेकदा महिला जेवणात लसूण घालायला विसरतात कारण लसूण सोलणं म्हणजे त्यांना किचकट काम वाटतं. (How to Remove Garlic Skin Easily At Home)

लसणाची सालं काढून टाकायला बराचवेळ लागतो, हातांना अनेकदा तीव्र वासही येतो. (How to Peel Garlic in Just 2 Mins) अनेकजण सालीसकट लसूण भाजीत घालतात. (How To Peel Garlic Fast) पण लसूण सालीसाकट घातल्याने पदार्थाची चव बिघडू शकते. लसूण पटकन सोलून होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स वापरू शकता. (How to Remove Garlic Peel)

1) लाटण्याचा वापर करू शकता

जर लसूण सोलायला तुम्हाला खूपच  त्रास होत असेस तर तुम्ही लाटण्याचा वापर करू शकता.  लाटण्याचा वापर केल्याने लसणाचे साल सहज निघतात. लाटण्याच्या साहाय्याने लसूण सोलणं खूपच सोपं होतं.  ज्यामुळे हे काम करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळही लागत नाही.   सगळ्यात आधी लाटणं लसणांवर फिरवा. २ ते ३ फिरवल्यानंतर लसणाची सालं काढून होतील. या उपायाने साली लगेच निघतील.

2) गरम पाण्याचा वापर करा

लसूण सोलण्यासाठी तुम्ही गरम पाण्याचा वापर करू शकता.  सगळ्यात आधी एक बाऊल घेऊन गरम पाणी घाला. त्यात लसणाच्या कळ्या घाला. त्यानंतर बाऊल काहीवेळासाठी ओव्हनमध्ये ठेवा. हलक्या हाताने रगडून सालं काढून घ्या. ज्यामुळे हातांना लसणाचा वास  येणार नाही.

चपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय, किती प्रमाणात खायचं? वेट लॉसचं सोपं गणित

3)  सुरीचा वापर करा

लसणाची सालं काढण्यासाठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता.  लसणाची सालं काढून टाकण्यासठी तुम्ही सुरीचा वापर करू शकता. लसणाच्या सुरीचं टोक काढून टाका  ज्यामुळे सालं काढून टाकण्यास मदत होईल.
याव्यतिरिक्त लसणाचे साल काढून टाकण्यासाठी तुम्ही दगडाचा वापर करू शकता.

यासाठी तुम्हाला लसूण हलका बारीक करावा लागेल नंतर साल आपोआप निघेल. लसूणाची सालं काढण्यासाठी तुम्ही लसणाच्या पाकळ्यांचा वापर करू शकता. लसूण सोलल्यानंतरही तुमच्या हातांना स्मेल येत  असेल तर तुम्ही हातांना सफरचंदाचे  व्हिनेगर किंवा नारळाचे तेल लावू शकता. 

Web Title: How To Remove Garlic Skin Quickly : How To Peel Garlic Fast Kitchen Hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.