लसूण तब्येतीसाठी फायदेशीर असतो. यामुळे रोगप्रतिकारकशक्तीवर पॉझिटिव्ह परिणाम होतो. कांदा लसणाशिवाय जेवण चवदार बनत नाही हे खरं असलं तरी, कांदा किंवा लसूण कापल्यानंतर हातावर त्याच्या वास बराचवेळ तसाच राहतो. जेव्हा तुम्ही कोणतीही भाजी किंवा खिचडी बनवण्यासाठी लसूण सोलता तेव्हा हातांना त्याचा वास तसाच राहतो. (Kitchen Hacks) इतकंच नाही तर आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांनाही त्याचा वास येऊ शकतो. काही सिंपल ट्रिक्स हातांमधून काही मिनिटात लसणाचा वास काढून टाकण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (How to Remove Garlic Smell from Hands)
१) मीठ
लसणाचा वास हातातून जात नसेल, तर हँडवॉशमध्ये मीठ टाका आणि नंतर हात चोळून धुवा. लसणाचा वास हातातून निघून जाईल.
२) व्हिनेगर
हाताला लसणाचा वास येत असेल तर एक चमचा ऍपल सायडर व्हिनेगर घेऊन हात चांगले चोळा. काही वेळाने हात पाण्याने धुवा, वास नाहीसा होईल.
३) टूथपेस्ट
टूथपेस्ट हातावर घ्या आणि हाताने मसाज करा, काही वेळाने हात धुवा या उपायानं लसणाचा वास येणार नाही.
४) नारळाचं तेल
लसणाचा वास काढून टाकण्यासाठी खोबरेल तेलात कापूर टाकून तळहातांना मसाज करा. काही वेळाने हात पाण्याने धुवा. याच्या वापराने सर्व प्रकारचा वास हातातून निघून जाईल.
५) लिंबाचा रस
लसणाचा वास दूर करण्यासाठी आपल्या हातात चिरलेला लिंबू घ्या आणि हात आणि बोटांवर चांगले चोळा. दोन मिनिटांनी हात पाण्याने धुवा. हातांना लिंबाचा छान वास येईल.