Lokmat Sakhi >Social Viral > गणपती विसर्जन: कपड्यांवरचे गुलालाचे डाग कसे काढायचे? २ सोप्या टिप्स- कपडे होतील चकाचक

गणपती विसर्जन: कपड्यांवरचे गुलालाचे डाग कसे काढायचे? २ सोप्या टिप्स- कपडे होतील चकाचक

How To Remove Gulal Stains From Clothes: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपड्यांवर जर गुलालाचे डाग पडले तर ते कसे काढायचे, याचे काही सोपे उपाय पाहून घ्या..(simple tips and tricks to remove colour stains from clothes)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2024 10:55 AM2024-09-16T10:55:54+5:302024-09-16T10:57:43+5:30

How To Remove Gulal Stains From Clothes: गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान कपड्यांवर जर गुलालाचे डाग पडले तर ते कसे काढायचे, याचे काही सोपे उपाय पाहून घ्या..(simple tips and tricks to remove colour stains from clothes)

how to remove gulal stains from clothes, simple tips and tricks to remove colour stains from clothes | गणपती विसर्जन: कपड्यांवरचे गुलालाचे डाग कसे काढायचे? २ सोप्या टिप्स- कपडे होतील चकाचक

गणपती विसर्जन: कपड्यांवरचे गुलालाचे डाग कसे काढायचे? २ सोप्या टिप्स- कपडे होतील चकाचक

Highlights गुलालाचे डाग कपड्यांवरून अगदी पुर्णपणे जाऊ शकतात. पण आपल्याला मात्र ती ट्रिक माहिती नसते. म्हणूनच आता हे काही उपाय पाहून घ्या...

मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत केल्यानंतर १० दिवस मोठ्या उत्साहाने, आनंदाने आपण त्याचे कोडकौतूक करत असतो. सगळीकडे नुसता उत्साह असतो. अनंत चतुर्थीच्या दिवशी मात्र मग या उत्साहाला आणखी उधाण येतो. अनेक ठिकाणी गणपती विसर्जन मिरवणुकीचे मोठ्या धडाक्यात आयोजन केले जाते (how to remove gulal stains from clothes?). यामध्ये गुलाल उधळणे ओघाने आलेच. मग बऱ्याचदा आपल्या चांगल्या कपड्यांवर गुलालाचे डाग पडतात. हे गुलालाचे डाग कपड्यांवरून अगदी पुर्णपणे जाऊ शकतात. पण आपल्याला मात्र ती ट्रिक माहिती नसते. म्हणूनच आता हे काही उपाय पाहून घ्या...(simple tips and tricks to remove colour stains from clothes)

 

कपड्यांवर पडलेले गुलालाचे डाग कसे काढून टाकावे?

१. नेलपेंट रिमुव्हर

कपड्यांवर जर मोजक्याच ठिकाणी गुलालाचे डाग पडले असतील तर ही एक पद्धत तुम्हाला त्यासाठी वापरता येईल. यासाठी एका वाटीमध्ये इनो घ्या. त्यामध्ये २ चमचे नेलपेंट रिमुव्हर टाका आणि त्याची पेस्ट तयार करा.

बेदाणे खा, पण ते खरेदी करताना 'ही' गोष्ट तपासून घ्या, नाहीतर होईल तब्येतीचं नुकसान

ही पेस्ट जिथे डाग पडलेले आहेत, त्या डागांवर लावून ठेवा. यानंतर साधारण १० ते १२ मिनिटांनी एका भांड्यात गरम पाणी घ्या. त्या पाण्यामध्ये डाग पडलेला कपड्याचा भाग बुडवून ओलसर करा. आता त्यावर थोडं लिंबू चोळा आणि त्यानंतर साबण लावून तो भाग ब्रशने घासून घ्या. कपड्यांवरचा डाग पुर्णपणे गेलेला असेल. 

 

२. बेकिंग सोडा

कपड्यांवर जर खूपच डाग पडले असतील तर हा उपाय तुम्हाला नक्कीच करता येईल. यासाठी बादलीमध्ये २ चमचे बेकिंग सोडा घ्या. त्यामध्ये २ चमचे डिटर्जंट पावडर टाका.

तुम्ही जास्त प्रमाणात साखर खाता हे सांगणारी ८ लक्षणं, घरच्याघरी करा स्वत:चीच परीक्षा

यामध्ये गरम पाणी टाका आणि त्यात गुलालाचे डाग पडलेला कपडा १५ ते २० मिनिटांसाठी भिजत घाला. यानंतर ब्रशने हलक्या हाताने घासून काढा. कपड्यांवरचे गुलालाचे डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेले असतील. 

 

Web Title: how to remove gulal stains from clothes, simple tips and tricks to remove colour stains from clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.