Join us  

बादल्यांवर पांढरे डाग-मेणचट थर जमा झालाय? ३ सोपे उपाय, न घासता बादल्या होतील चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2023 5:03 PM

How to Remove Hard Water Stains from Bucket : बकेट्सवरील मेणचट डाग काढणे म्हणजे अवघड काम, यावर ३ उपाय करतील मदत

बाथरूममध्ये पाण्याचा वापर जास्त होतो. प्रत्येकाच्या बाथरूममध्ये आपल्याला बादली किंवा मग सापडणारच. आपण यांचा वापर पाणी साठवण्यासाठी करतो. पण कालांतराने बादल्या आणि मग लवकर खराब होतात. शिवाय त्यावर पांढरा थरही निर्माण होतो. ज्यामुळे ते अधिक खराब दिसतात.

बादली आणि आंघोळीचा मग स्वच्छ दिसू लागले की, त्याचा रंगही बदलू लागतो. त्यामुळे अनेकदा पाहुण्यांसमोर लाजिरवाणे वाटू शकते. अनेकदा बादल्यांवरील पांढरे डाग घासूनही निघत नाही. बादल्यांवरील पांढरे डाग काढण्यासाठी कोणता उपाय उपयुक्त ठरेल? कोणत्या उपायाने बादल्या चकाचक स्वच्छ होतील पाहा(How to Remove Hard Water Stains from Bucket).

बेकिंग सोडा

बेकिंग सोड्याचा वापर आपण सहसा जेवणात करतो. पण याच्या वापराने आपण बादल्या देखील स्वच्छ करू शकता. यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा, भांडी घासण्याचा साबण, लिंबाचा रस घेऊन मिक्स करा. जुन्या ब्रशने पेस्ट बादली आणि मगवर लावा. १० मिनिटानंतर बादली आणि मग स्वच्छ घासून काढा.

‘डीपफेक’ व्हिडिओत रश्मिकाचा चेहरा जिच्या व्हिडिओवर लावण्यात आला ‘ती’ मुलगी कोण? नक्की करते काय?

व्हिनेगर

सहसा चायनीज फूड तयार करण्यासाठी व्हिनेगरचा वापर होतो. आपण याचा वापर बादल्या आणि मग स्वच्छ करण्यासाठीही करू शकता. यासाठी एका वाटीत २ कप व्हिनेगर घ्या, त्यात समप्रमाणात पाणी मिक्स करा. नंतर जुना ब्रश व्हिनेगरच्या मिश्रणात बुडवून बदल्यांवर लावून घासून काढा.

दिवाळीपूर्वी वजन काम करायचंय? आजपासून तातडीने खा ५ पदार्थ, वजन घटेल आणि चेहऱ्यावरही येईल चमचमता ग्लो

लिंबू

लिंबाच्या रसामध्ये अॅसिटिक अॅसिड असते, जे पाण्याचे डाग सहज काढण्यास मदत करतात. बादल्यांवरील पांढरे डाग काढण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावा, ३० मिनिटानंतर डिटर्जंटने बादल्या स्वच्छ घासून काढा. शेवटी पाण्याने बादल्या धुवा.

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलसोशल मीडिया