Join us  

शॉवरमधील पाणी उडून संपूर्ण बाथरूममध्ये पांढरे डाग पडलेत? करा १ इन्स्टंट उपाय, डाग होतील गायब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2024 6:08 PM

How to clean glass shower doors with hard water stains : How to Clean Glass Shower Doors : शॉवरमधील पाण्याचे थेंब सगळीकडे उडून नंतर त्याचे पांढरे डाग पडतात, असे डाग स्वच्छ करण्यासाठी १ ट्रिक...

आजकाल सगळ्यांच्याच बाथरुममध्ये शॉवर असतो. बरेचदा आपण शॉवरखाली आंघोळ करणे पसंत करतो. शॉवरखाली आंघोळ केल्याने बरेचदा शॉवर मधून पडणाऱ्या पाण्याचे थेंब बाथरुममध्ये सगळीकडे उडतात. आंघोळीसाठी शॉवरचा वापर केल्याने आपल्याला एकदम फ्रेश तर ताजेतवाने वाटते. परंतु आंघोळीसाठी शॉवरचा वापर केल्याने शॉवरमधील पाण्याचे थेंब सगळीकडे उडून नंतर त्याचे पांढरे डाग पडतात. आपण कित्येकदा पाहिले असेल की बाथरूमच्या भिंती, दरवाजे, खिडक्या,बाथरूम मधील आरसे यांवर शॉवरचे पाणी उडून त्या पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग पडलेले दिसतात(How to Remove Hard Water Stains From Glass).

बाथरुममधल्या सगळ्या वस्तूंवर जर असे पांढरे डाग पडले तर बाथरुम अगदी अस्वच्छ दिसते. यामुळे बाथरुम कधी स्वच्छ केले नाही असे वाटते, त्याचबरोबर जर वेळोवेळी हे पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग स्वच्छ केले नाही तर ते डाग अधिक हट्टी होऊन नंतर जाता जात नाही. अशावेळी आपण कित्येकदा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लिनर्स, घासणी, फिनाईल अशा अनेक गोष्टींचा वापर करुन पाहतो. त्याचबरोबर आपल्या बाथरुम मध्ये शॉवरचे एक वेगळे पॅनल असते त्या स्टीलच्या पॅनलवर देखील असेच डाग पडलेले असतात. हे शॉवरच्या पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग अगदी सहजरित्या घालवण्यासाठी आपण महागड्या क्लिनर्स पेक्षा घरात उपलब्ध असणाऱ्या काही गोष्टींचा वापर करून हे पांढरे डाग झटपट काढू शकतो. यासाठी नेमके करायचे काय ते पाहूयात(How to clean glass shower doors with hard water stains).

१. बाथरूमच्या भिंतींवरील शॉवरच्या पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग घालवण्यासाठी... 

१. एक बाऊलमध्ये प्रत्येकी २ टेबलस्पून बेकिंग सोडा, खोबरेल तेल, लिक्विड सोप घेऊन हे सगळे घटक एकत्रित करून मिक्स करून घ्यावेत. हे सगळे घटक एकत्रित मिक्स करून त्याची थोडी पातळसर पेस्ट तयार करुन घ्यावी. 

२. आता ज्या भागांवर शॉवरच्या पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग आहेत त्या भागांवर ही पेस्ट स्पंजच्या मदतीने लावून घ्यावी. ही पेस्ट डागांवर १५ ते २० मिनिटे तशीच लावून ठेवावे. 

३. आता २० मिनिटानंतर घासणी किंवा स्क्रबरच्या मदतीने हे डाग व्यवस्थित घासून घ्यावे. त्यानंतर गरम पाण्याने तो भाग स्वच्छ धुवून घ्यावा. अशाप्रकारे या सोप्या टिप्सचा वापर करुन आपण ज्या भागांवर शॉवरच्या पाण्याच्या थेंबांचे पांढरे डाग अगदी सहजरित्या काढू शकतो. 

भांडी घासण्याचा स्क्रबर किती दिवस वापरावा? तज्ज्ञ सांगतात, १ चूक पडते महागात -इन्फेक्शनचा धोका वाढतो...

२. बाथरुममधील हार्ड वॉटरचे पडलेले डाग काढण्यासाठी... 

१. बाथरूमच्या भिंती, दरवाजे, खिडक्या,बाथरूम मधील आरसे यांवर काहीवेळा हार्ड वॉटर म्हणजेच क्षारयुक्त पाण्याचे डाग पडतात. हे डाग सहजरित्या काढण्यासाठी आपण व्हिनेगरचा वापर करू शकतो. 

२.  बाथरूममधील क्षारयुक्त पाण्याचे डाग काढण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये व्हिनेगर घेऊन त्यात तेवढेच पाणी ओतावे. म्हणजेच पाणी आणि व्हिनेगर हे दोन्ही समप्रमाणात असतील. आता हे द्रावण एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने हार्ड वॉटरच्या डागांवर लावून घ्यावे. त्यानंतर १५ ते २० मिनिटे हे द्रावण डागांवर तसेच ठेवून द्यावे. 

३. १५ मिनिटानंतर स्क्रबर, घासणी किंवा टूथब्रशच्या मदतीने हे डाग घासून घ्यावेत. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावेत. अशाप्रकारे आपण बाथरूममधील हार्ड वॉटरचे डाग अगदी झटपट काढू शकतो.

घरातील डस्टबीनमधून येते कुबट दुर्गंधी? ५ सोपे उपाय, डस्टबीन वारंवार स्वच्छ करण्याची गरजच नाही...

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स