Join us  

फ्रिजरमध्ये बर्फाचा डोंगर होतो-पाणी गळतं? ३ सोप्या ट्रिक्स-फ्रिज बंद न करता बर्फ होईल कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2024 11:02 AM

How To Remove Ice From Freezer : तुमच्याकडे कमी वेळ आहे आणि फ्रिज लवकर साफ करायचं असेल तर तर तुम्ही काही सोपे उपाय वापरू शकता.

घरात ठेवलेलं सामान दीर्घकाळ फ्रेश राहण्यासाठी आपल्याला फ्रिजची गरज भासते. फ्रिजच्या मदतीनं तुम्ही दीर्घकाळ जेवण स्टोअर करून ठेवू शकता. डिप फ्रिजर एरियामध्ये आपण असे काही पदार्थ साठवून ठेवतो जे आपल्याला जास्तवेळासाठी ठेवायचे असतात. हवेत मॉईश्चर वाढल्यामुळे डिप फ्रिजमध्ये बर्फ जमा होतो. अनेकदा बर्फाचे डोंगरसुद्धा तयार होतात. जर तुम्हाला बर्फ साफ करायचा असेल तर तुम्ही डिफ्रॉस्टिंगची मदत घेऊ शकता. पण यासाठी तुम्हाला बरीच वाट पाहावी लागते.  जर तुमच्याकडे कमी वेळ आहे आणि फ्रिज लवकर साफ करायचं असेल तर तर तुम्ही काही सोपे उपाय वापरू शकता. (How To Remove Ice From Freezer)

सुपर होम वॉरंटीच्या रिपोर्टनुसार फ्रिजमध्ये बर्फ तयार होणं टाळण्यासाठी फ्रिज भिंतीला चिकटवून ठेवू नका.  ज्यामुळे हवेचं सर्क्युलेशन व्यवस्थित होत नाही. कुलिंग फॅन, व्हेंट आणि कंडेन्सर  कॉईलमधील घाण स्वच्छ साफ करा. रेफ्रिजरेटर आणि फ्रिजरच्या आत तापमान मापकाचे निरिक्षण करा.  रेफ्रिजरेटर  ३५ ते ४२ डिग्री फॅरेनडाईट असावा.

फ्रिजरमध्ये साचलेला बर्फ साफ करण्याच्या पद्धती

१) फ्रिद बंद करा 

फ्रिजमधला बर्फ वितळवण्यासाठी तुम्ही फ्रिज बंद करू शकता.  फ्रिज अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी पाणी पडल्यावर त्रास होणार नाही. नंतर एक बादली पाणी गरम करून घ्या नंतर मगच्या मदतीनं फ्रिजरवर घाला ज्यामुळे बर्फ हळू हळू वितळेल. 

२) दुसरी पद्धत

एक असं भांड घ्या जे तुम्ही फ्रिजरमध्ये सहज ठेवू शकाल नंतर  त्या भांड्यात उकळतं पाणी ठेवा फ्रिजरमध्ये ठेवून दार बंद करा. गरम स्टिममुळे बर्फ वितळेल.

३) तिसरी पद्धत

तुमच्या घरात हेअर ड्राय असेल तर  याचा वापर करून तुम्ही बर्फ वितळवू शकता.  यासाठी तुम्ही फ्रिजरचा डोअर ओपन करा नंतर हेअर ड्रायर ऑन करा. याचा मोड हाय हिटवर ठेवा नंतर हवा फ्रिजरच्या आतल्या बाजूला येऊ द्या. ज्यामुळे गरम हवा वितळण्यास मदत होईल. जेव्हाही तुम्ही बर्फ काढाल तेव्हा स्टिल किंवा कोणत्याही धातूच्या चमच्याचा वापर करू  नका. तुम्ही लाकडाच्या चमच्याचा वापर करू शकता. जर तरीही फ्रिज खराब होत असेल तर सर्विस सेंटरमध्ये दाखवा.

टॅग्स :सोशल व्हायरलसुंदर गृहनियोजनहोम अप्लायंस