तेलाचे डाग प्रचंड हट्टी असतात. ते कपड्यांवर किंवा भिंतीवर पडले तर, सहसा लवकर निघत नाही. मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात फोडणी देताना तेल भिंतीवर उडते. ज्यामुळे स्वयंपाकघरातील भिंत अधिक मेणचट आणि काळपट दिसू लागते. शिवाय फोडणीचे हे डाग सहसा लवकरही निघत नाही (Kitchen Stains). भिंतीवरचे फोडणीचे डाग काढणे अवघड काम. बऱ्याचदा हे डाग निघत नाही. ज्यामुळे भिंतीवरचा रंग बदलण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही (Social Viral). यामुळे खर्च तर वाढतोच, शिवाय पुन्हा स्वयंपाक घराच्या भिंतीवर तेच फोडणीचे डाग पडतात.
स्वयंपाक घराच्या भिंतीवर जर फोडणीचे डाग पडले असतील, ३ घरगुती टिप्सची मदत घ्या (Kitchen Tips). या टिप्सच्या मदतीने फोडणीचे मेणचट डाग निघतील, शिवाय पेंट देखील खराब होणार नाही(How to remove Kitchen stains from wall without removing wall paint).
भिंतीवरील फोडणीचे मेणचट-काळपट डाग घालवण्यासाठी काही टिप्स
बेकिंग सोडा
स्वयंपाक घराच्या भिंतीवर फोडणीचे मेणचट डाग पडले असतील तर, बेकिंग सोड्याची मदत घ्या. यासाठी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून पेस्ट तयार करा. तयार पेस्ट भिंतीवरच्या डागांवर लावा. १५ मिनिटानंतर सुकल्यावर डाग कोरड्या कापडाने पुसून काढा.
नववीत मिळाली चित्रपटाची ऑफर-१९ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप; दिव्या भारतीला कमी वयात मिळालं यश पण...
टूथपेस्ट
टूथपेस्टच्या मदतीनेही आपण भिंतीवरचे फोडणीचे मेणचट डाग काढू शकता. यासाठी फोडणीच्या डागांवर टूथपेस्ट लावा, व काही वेळानंतर ओल्या कापडाने डाग पुसून काढा. यामुळे काही वेळात डाग निघून जातील.
एकटीने प्रवास करणाऱ्या तरुणीचे बळकावले सीट, ट्विट व्हायरल होताच रेल्वे प्रशासनाची मदत
बेबी पावडर
बेबी पावडर तेल शोषण्यास मदत करते. आपण याच्या वापराने भिंतीवरचे फोडणीचे काढू शकता. यासाठी फोडणीच्या डागांवर बेबी पावडर शिंपडा आणि काही तास तसंच राहू द्या. नंतर स्वच्छ कापडाने भिंतीवरून पावडर काढून टाका. यासोबत फोडणीचे मेणचट डागही निघतील.