Join us  

लोकरीच्या कपड्यावर बुंदके आले? करा ४ उपाय, लोकरीचे कपडे वर्षानूवर्षे दिसतील नवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2022 10:24 PM

How to Remove Lint: लोकरीचे किंवा काही कॉटनचे कपडे एक- दोनदा धुवून झाले की त्यांच्यावर बुंदके किंवा गोळे दिसू लागतात. ते गोळे काढून टाकण्यासाठी हे काही उपाय करून बघा..

ठळक मुद्देबऱ्याचदा तर जीन्सवरही असे बुंदके- गोळे दिसतात. त्यामुळे मग कपड्यांवर एक प्रकारचा जुनाटपणा येतो.

लोकरीचे कपडे आपण काही दरवर्षी नविन घेत नाही. काही स्वेटर, शाल, पांघरुणं ३- ४ वर्षांपुर्वीचीही असतात. त्यामुळे हे कपडे धुतले गेले की त्यापैकी काही कपड्यांवर एक- दोन धुण्यातच बुंदके दिसू लागतात. काही भागात याला गोळे असंही म्हणतात. काही कॉटनच्या कपड्यांवरही बुंदके किंवा गोळे (lint) दिसतात. बऱ्याचदा तर जीन्सवरही असे बुंदके- गोळे दिसतात. त्यामुळे मग कपड्यांवर एक प्रकारचा जुनाटपणा येतो. म्हणूनच हे काही उपाय करून बघा. यामुळे कपड्यांवरचे (woolen and cotton clothes) बुंदके किंवा गोळे निघून जातील आणि कपडे दिसतील नव्यासारखे फ्रेश.

 

लोकरीच्या कपड्यांवरचे गोळे- बुंदके काढून टाकण्यासाठी उपाय१. हे गोळे किंवा बुंदके काढून टाकण्यासाठी बाजारात लिंट रिमुव्हर मिळतं. किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही तुम्ही ते खरेदी करू शकता. हे मशिन कपड्यांवरून हळूवारपणे फिरवल्यास बुंदके निघून येतात. 

घागरा- लेहेंगा घ्यायचाय? १ हजारपेक्षाही कमी किमतीत ३ सुंदर पर्याय, अगदी स्वस्तात मस्त खरेदी 

२. कंगव्याचा उपयोग करूनही कपड्यांवरचे बुंदके काढता येतात. त्यासाठी बारीक दाताचा कंगवा वापरावा आणि तो कपड्यांवरून केस विंचरल्याप्रमाणे फिरवावा. कंगव्यात अडकून बुंदके बाहेर येतात. 

 

३. प्यूमिक स्टोनचा वापर करूनही कपड्यांवरील बुंदके काढू शकता. कंगव्याप्रमाणेच प्यूमिक स्टोनही कपड्यांवरून हळूवारपणे फिरवा. कपडे लगेचच फ्रेश नव्यासारखे दिसू लागतील.

सर्दी- खोकल्यावर उत्तम घरगुती उपाय, आलं- गूळ घातलेली गुणकारी गोळी, बघा कशी करायची

४. इलेक्ट्रिक रेझरचा वापरही या कामासाठी करता येतो. रेझर सुरू करून कपड्यांवरून अलगदपणे आणि अगदी वरवर फिरवावे. पण हा प्रयोग खूप सावधपणे करावा. कारण रेझरला असणाऱ्या ब्लेडमुळे कपडे फाटूही शकतात.  

टॅग्स :सोशल व्हायरलस्वच्छता टिप्स