Lokmat Sakhi >Social Viral > कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

How To Remove Lipstick Stains On Clothes?: मेकअप करताना घाई- गडबडीत कपड्यांवर कॉस्मेटिक्सचे डाग पडतातच. ते काढून टाकण्यासाठी बघा हे साधे- सोपे उपाय....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2024 12:08 PM2024-04-30T12:08:30+5:302024-04-30T12:09:11+5:30

How To Remove Lipstick Stains On Clothes?: मेकअप करताना घाई- गडबडीत कपड्यांवर कॉस्मेटिक्सचे डाग पडतातच. ते काढून टाकण्यासाठी बघा हे साधे- सोपे उपाय....

How to remove lipstick, foundation and other cosmetics stains on clothes? | कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग कसे काढायचे? ४ सोप्या ट्रिक आणि डाग गायब

Highlights तुमच्याही कपड्यांवर लिपस्टिक, फाउंडेशन किंवा इतर कॉस्मेटिक्सचे डाग पडले असतील तर ते कशा पद्धतीने स्वच्छ करायचे ते पाहा...

सकाळच्या धावपळीत घरातलं सगळं आवरून वेळेवर ऑफिस गाठणं हे वर्किंग वुमनसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं. आता ऑफिसला जायचं म्हणजे कसंही जाऊन चालत नाही. थोडाफार मेकअप करून प्रेझेंटेबल दिसणं तर गरजेचं असतंच. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की धावपळीत, घाई- गडबडीत हातातलं मेकअपचं सामान पडतं, त्याचा कपड्यांवर डाग लागतो. खरं तर ते पाहूनच आपण वैतागतो. पण खरा त्रास तेव्हाच होतो, जेव्हा प्रयत्न करूनही ते डाग जात नाहीत. तुमच्याही कपड्यांवर लिपस्टिक, फाउंडेशन किंवा इतर कॉस्मेटिक्सचे डाग पडले असतील तर ते कशा पद्धतीने स्वच्छ करायचे ते पाहा... (How to remove lipstick, foundation and other cosmetics stains on clothes?)

कपड्यांवर पडलेले लिपस्टिक, फाउंडेशनचे डाग काढून टाकण्यासाठी उपाय

 

१. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा हा पदार्थ जसा स्वयंपाक करताना कामी येतो, तसाच किंबहुना त्यापेक्षाही खूप जास्त स्वच्छतेच्या कामांसाठी उपयोगी पडतो.

हेल्दी समजून खाता त्या पनीरमध्ये डिटर्जंट, युरिया तर नाही ना? पनीरमधली भेसळ ओळखण्यासाठी ४ टिप्स

कपड्यावर जर लिक्विड फाउंडेशन, आय लायनर, लिपस्टिक यांचे डाग पडले असतील तर त्या डागांवर बेकिंग सोडा टाका. ५ ते ७ मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर एखादा टुथब्रश आणि थोडं पाणी घेऊन त्याठिकाणी घासून काढा. डाग गेला नसेल तर पुन्हा ही क्रिया करा आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे साबण लावून कपडा धुवून टाका.

 

२. हेअर ड्रायर

बऱ्याचदा कपड्यांवर लूज पावडर, पावडर फाउंडेशन सांडतं. ते आपण हाताने पुसायला गेलं तर ते कपड्यांवर पसरतं.

काय सांगता विद्या बालनकडे आहेत फक्त २५ साड्या? आणि त्या साड्याही अशा आहेत की....

म्हणून ते कपड्यांवरून चटकन काढून टाकण्यासाठी हेअर ड्रायर वापरा. यामुळे ते अजिबात पसरणार नाही आणि त्याचा डागही पडणार नाही. 

 

३. शेव्हिंग क्रिम

शेव्हिंग क्रिम लावूनही तुम्ही कपड्यांवर पडलेले कॉस्मेटिक्सचे डाग काढून टाकू शकता.

साधी इडली नेहमीच खाता, आता कर्नाटकातली प्रसिद्ध थट्टे इडली खाऊन पाहा, घ्या सोपी रेसिपी....

४. मेकअप रिमुव्हर

मेकअप रिमुव्हर लिक्विडचा उपयोग जसा चेहऱ्यावरचा मेकअप काढण्यासाठी होतो, तसाच तो कपड्यांवरचे कॉस्मेटिक्सचे डाग काढण्यासाठीही होतो. हा एक सोपा प्रयोग कधी करून बघा.. 

 

Web Title: How to remove lipstick, foundation and other cosmetics stains on clothes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.