लवकरच नवरात्र, दसरा, दिवाळी असे सणावाराचे दिवस सुरू होत आहेत. आता सणावाराच्या निमित्ताने किंवा त्यानंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईमुळे या दिवसांत कपाटात ठेवलेल्या अनेक ठेवणीतल्या साड्या बाहेर येऊ लागतात. या साड्या आपण कित्येक महिन्यांनी किंवा मग वर्षानंतरच बाहेर काढतो. त्यामुळे मग त्यांना एक प्रकारचा कुबट वास येतो (How to Remove Odors From Silk Sarees). अशा वास येणाऱ्या साड्या मुळीच घालाव्या वाटत नाहीत. म्हणूनच साड्यांचा वास निघून जावा, यासाठी हे काही सोपे उपाय करून पाहा. साड्या सुगंधी होतील.....(3 Tips to make your musty smelly sarees fresh )
ठेवणीतल्या साड्यांचा कुबट वास कसा काढायचा
१. व्हिनेगर
साड्यांचा कुबट वास घालविण्यासाठी व्हिनेगरचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर आणि पाणी सम प्रमाणात घ्या आणि ते साड्यांवर स्प्रे करा.
ब्लाऊज सैल झालं- खांद्यावरुन उतरतं आहे? फक्त १ मिनिटांत करा परफेक्ट फिटिंग, बघा सोपी ट्रिक
साडी जर सिल्कची असेल तर ती साडी पसरवून ठेवा. त्या साडीवर एक पातळ सुती कपडा अंथरा आणि मग त्या कपड्यावर व्हिनेगर स्प्रे करा. व्हिनेगर नसेल तर लिंबाच्या रसाचाही उपयोग करता येईल.
२. इसेंशियल ऑईल
ठेवणीतल्या कपड्यांचा दुर्गंध कमी करून त्या सुगंधित करण्यासाठी हा एक सोपा उपाय करता येतो.
गुलाबाला येतील फुलंच फुलं, रोप लावताना लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी, काही दिवसांतच येईल गुलाबाला बहर
यामुळे कपडे न धुताही छान सुगंधित होतात. हा उपाय करण्यासाठी अर्धा लीटर पाण्यात तुमच्या आवडत्या कोणत्याही इसेंशियल ऑईलचे ४ ते ५ थेंब टाका. त्यानंतर हे मिश्रण साड्यांवर स्प्रे करा. सिल्कची साडी असेल तर त्यावर एखादा कपडा टाका आणि त्या कपड्यावर स्प्रे करा. तो कपडा साडीवर अर्धा तास तसाच राहू द्या.
३. फ्रिजमध्ये ठेवा
साडी फ्रिजमध्ये ठेवूनही तिचा दुर्गंध जाऊ शकतो. जी साडी सिल्कची नाही ती तशीच पेपरमध्ये गुंडाळून अर्धा- एक तास फ्रिजमध्ये ठेवा.
जी साडी सिल्कची आहे, ती एका प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये टाका. त्या बॅगचं तोंड उघडं ठेवून ती फ्रिजमध्ये ठेवा. साडीला पाणी लागणार नाही याची काळजी घ्या.