टॉवेल ही अगदी रोजच्या वापरातली वस्तू. काही जण अगदी रोजच्या रोज टॉवेल धुवायला टाकतात, तर काही जण दर दोन- तीन दिवसांतून एकदा टॉवेल धुतात. पण या दोन्ही प्रकारे टॉवेल धुणाऱ्या बहुतांश व्यक्तींना असा अनुभव येतो की टॉवेल धुतला तरीही त्याला येणारा कुबट वास काही जात नाही (How to remove odour or bad smell from the towel). अंग पुसताना तो वास जाणवतो आणि मग खूपच अस्वच्छ वाटू लागतं (how to wash towel?). म्हणूनच टॉवेलचा कुबट वास घालविण्यासाठी तसेच त्याला नेहमीपेक्षा आणखी स्वच्छ आणि सुगंधी करण्यासाठी तो कशा पद्धतीने धुवावा, ते पाहून घ्या.(proper method of washing towel in marathi)
टॉवलेचा कुबट वास घालविण्यासाठी उपाय
अंडरवेअर जसे आपण इतर कपड्यांमध्ये न टाकता वेगळे धुतो, तसेच टॉवेलदेखील इतर कपड्यांमध्ये न टाकता वेगळे धुवावेत, असे अनेक जण सांगतात.
'ॲनिमल'च्या पार्टीत आलिया भटच्याच ड्रेसची चर्चा, कारण तिने घातलेल्या ड्रेसची किंमत होती चक्क....
टॉवेल धुण्यासाठी सगळ्यात आधी एका बादलीमध्ये कडक पाणी घ्या. त्यात २ ते ३ टेबलस्पून व्हाईट व्हिनेगर आणि १ टेबलस्पून बेकिंग सोडा टाका. हे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि या मिश्रणात साधारण एखादा तास टॉवेल भिजत घाला.
यानंतर पुन्हा एका बादलीमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात थोडं डिटर्जंट टाकून टॉवेल अर्धा तास भिजत ठेवा. यानंतर ब्रशने घासून टॉवेल धुवून टाका.
बाळाच्या बोरन्हाणला हलव्याचे दागिने घ्यायचे? बघा ३ सुंदर पर्याय, बाळ दिसेल सुंदर- गोजिरवाणं
हा उपाय केल्याने टॉवेलला येणारा कुबट वास तर जाईलच, पण त्यावर पडलेले पिवळट, काळपट डागही निघून जातील आणि टॉवेल छान स्वच्छ दिसू लागेल.
टॉवेलला कुबट वास येत असेल तर तो खूप जुना झाला आहे का, हे देखील एकदा तपासून पाहा. एक टॉवेल ६ ते ८ महिने वापरावा. त्यानंतर बदलून टाकावा.