कढई हे स्वयंपाक घरात अगदी रोजच्या रोज लागणारे भांडे. भाजी असो, वरण असो किंवा मग एखादा तळणाचा पदार्थ करायचा असो, कढई हमखास लागतेच. बऱ्याचदा रोजच्या वापरातल्या कढई व्यवस्थित घासल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर तेलाचा थर साचत राहातो. अशा कढई दिसायलाही पिवळट- काळपट दिसतात आणि हात लावल्यावर लगेचच त्यांचा तेलकटपणा, चिकटपणा जाणवतो. एकदा कढईवर असा तेलाचा थर चढला की मग तो काढून टाकणं अवघड होतं (How to remove oil and grease stain from kitchen utensils). म्हणूनच आता अशा तेलकट, चिकट आणि पिवळट झालेल्या कढई स्वच्छ करण्यासाठी पुढे दिलेले काही उपाय करून पाहा. (Cleaning Tips For Oily Utensils)
कढईचा चिकटपणा- तेलकटपणा कसा स्वच्छ करायचा?
१. गरम पाणी
तेलकट- चिकट झालेल्या कढई स्वच्छ करण्यासाठी कधीही थंड पाणी वापरू नका. यामुळे कढईचा तेलकट थर कमी होणार नाही. कढईचा तेलकटपणा घालविण्यासाठी सगळ्यात आधी कढईमध्ये गरम पाणी टाका.
विकतचं केमिकलयुक्त गुलकंद कशाला? बघा घरच्याघरीच १०० टक्के नॅचरल गुलकंद करण्याची सोपी रेसिपी
अगदी कडक किंवा उकळतं पाणी केलं तरी चालेल. १५ ते २० मिनिटे ते पाणी कढईमध्ये तसेच राहू द्या. त्यानंतर कोणत्याही डिशवॉशचे काही थेंब तसेच मीठ एकत्र करून त्या कढईमध्ये टाका आणि घासणीने कढई घासून घ्या.
२. लिंबू
कढईचा चिकट- तेलकटपणा काढून टाकण्यासाठी लिंबाचा रस अतिशय उपयुक्त ठरतो.
कुंडीतल्या मातीचा कस वाढविणारे ३ पदार्थ, माती बदलण्याची गरज नाही- बाग नेहमीच सदाबहार राहील
यासाठी तेलकट झालेल्या कढईमध्ये लिंबाचा रस टाका. तो कढईच्या सगळ्या भागावर व्यवस्थित लावा. त्यानंतर १० मिनिटांनी त्या कढईमध्ये कडक पाणी टाका आणि घासणीने किंवा ब्रशने घासून कढई स्वच्छ करा. लिंबामुळे कढईतलं तेल शोषलं जातं.
३. बेकिंग सोडा
हा एक अगदी साेपा उपाय आहे. हा उपाय करण्याआधी कढईमध्ये १० ते १५ मिनिटांसाठी गरम पाणी टाकून ठेवा.
स्वयंपाक घरातला फक्त १ पदार्थ वापरा, केस गळणं १५ दिवसांतच होईल कमी- करून बघा...
त्यानंतर बेकिंग सोडा, लिक्विड डिशवॉश आणि पाणी हे एकत्र करून त्याची थोडी घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट कढईला लावा आणि घासणीने कढई घासून काढा. गरम पाण्याने कढई धुवून टाका. एकदम स्वच्छ होईल.