'धुवत राहा - धुवत राहा' अशी म्हणण्याची वेळ तेव्हा येते, जेव्हा कपड्यांवरील हट्टी डाग लवकर निघत नाही. अनेकदा आपल्या कपड्यांवर नकळत काहीतरी सांडतं. हे डाग सहसा पहिल्या धुण्यात निघत नाही. त्याला खूप वेळ घासावं लागतं. त्याचप्रमाणे तेलाचे डागही लवकर निघत नाही. या डागामुळे हळूहळू कापड कडक होते. ज्यामुळे आपण ते वापरणे टाळतो.
जर कपड्यांवरील तेलाचे डाग काढायचे असतील तर, ही ट्रिक नक्की वापरून पाहा. या ट्रिकमुळे न धुता कपड्यांवरील डाग १५ मिनिटात निघून जाईल. आता तुम्ही म्हणाल कपड्यांवरील तेलाचे डाग न धुता कसे निघून जातील. यासाठी ही ट्रिक पाहा(How to Remove Oil Stains From Clothes).
छोटी भूक भागवण्यासाठी चिप्स - कुरकुरे खाणं टाळा, घरीच करा कुरकुरीत मसाला काजू
तेलाचे डाग कपड्यांवरून न धुता काढण्यासाठी एक सोपी ट्रिक
कपड्यांवरील तेलाचे डाग काढण्यासाठी, आपण ब्रशने कापड घासत राहतो. तरी देखील हे डाग लवकर निघत नाही. कपड्यांवर जर तेलाचे डाग पडले असतील तर, त्यावर इन्स्टंट उपाय म्हणून बेबी पावडरचा वापर करून पाहा. कपड्यावर ज्या ठिकाणी तेल सांडलं असेल, त्या ठिकाणी त्वरित बेबी पावडर शिंपडून कोट करा. १५ मिनिटे ही पावडर तशीच डागावर राहूद्या. १५ मिनिटानंतर दुसऱ्या कापडाने पुसून काढा. यामुळे काही मिनिटात न धुता तेलाचे डाग कमी होऊन निघून जाईल.
युज ॲण्ड थ्रोवाले प्लास्टिक कप फेकू नका; ४ स्मार्ट उपयोग-प्लास्टिक कचराही होईल कमी
डिशवॉश आणि बेकिंग सोड्याचा करा वापर
हा उपाय करण्यासाठी तेलाचा डाग जिथे पडला आहे, त्यावर थोडे लिक्विड डिश वॉश टाकून ठेवा. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा टाका. १५ मिनिटांसाठी कापड तसेच राहू द्या. त्यानंतर ब्रशने कापड घासून काढा. व पाण्याने कापड स्वच्छ धुवून काढा. यामुळे तेलाचा डाग काही मिनिटात निघून जाईल.