Lokmat Sakhi >Social Viral > १ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे

१ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे

How to Remove Oil Stains from Clothes : कपड्यांवरचे तेलकट, हट्टी डाग काढून टाकण्यासाठी काही  सोप्या ट्रिक्स पाहूया.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:04 PM2023-08-11T18:04:37+5:302023-08-11T18:18:07+5:30

How to Remove Oil Stains from Clothes : कपड्यांवरचे तेलकट, हट्टी डाग काढून टाकण्यासाठी काही  सोप्या ट्रिक्स पाहूया.

How to Remove Oil Stains from Clothes : Easy Tricks to remove oil stains from clothes | १ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे

१ मिनिटात निघतील कपड्यांवरचे तेलाचे हट्टी डाग; सोपी ट्रिक, कपडे दिसतील स्वच्छ, नवे-कोरे

रोज  काम करताना, जेवताना कपड्यांवर वेगवेगळ्या प्रकारचे डाग लागत असतात.  एकदा डाग पडले की निघता निघत नाहीत. कपड्यांवरचे डाग काढून बाहेर लॉन्ड्रीमध्ये कपडे द्यावे लागतात किंवा घरीच तासनतास कपडे घासावे लागतात. कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी काही  सोप्या ट्रिक्स पाहूया. त्यात जर तुम्ही पांढऱ्या रंगाचा शर्ट किंवा टॉप घातला असेल तर डाग काढून टाकण्याचं म्हणजे टेंशनचं येतं. (Oil Stains from Clothes)

कपड्यांना डाग लागले असतील तर सगळ्यात आधी त्या डागांवर घरात उपलब्ध असलेली तोंडाला लावण्याची पावडर घाला. पण त्यावर एक चौकेनी आकाराच दुसरा छोटा कपडा ठेवा. १ ते २ मिनिटांसाठी त्या कापडावरून इस्त्री फिरवत राहा. त्यानंतर वरचा कपडा अलगद काढून घ्या. मग डागांवर लावलेली पावडर बाजूला करा. तुम्हाला दिसेल की, सर्व तेल पावडरवर चिकटले आहे. पावडर बाजूला केल्यानंतर तुम्हाला कपड्यांवर कोणताही डाग दिसतणार नाही. या पद्धतीने तुम्ही कोणत्याही कापडावर लागलेले डाग अगदी सहज काढू शकता. (Easy Tricks to remove oil stains from clothes)

हेअर स्प्रे

कपड्यांवर लागलेले डाग काढून टाकण्यासाठी हेअर स्प्रेचा वापर ही तुम्ही करू शकता. सगळ्यात आधी डाग लागलेल्या भागावर हेअर स्प्रे शिंपडा. यामुळे कपड्यांवर लागलेले तेलाचे डाग दूर होण्यास मदत होईल.

शॅम्पू

कपड्यांवरचे डाग काढून टाकण्यासाठी शॅम्पूसुद्धा उपयोगी ठरतो. त्यासाठी डाग लागलेल्या जागेवर २ थेंब शॅम्पू घाला हातांनी रगडा, नंतर पूर्ण कपडा व्यवस्थित धुवून घ्या. यामुळे डाग निघून जातील.

लिंबाचा रस

लिंबू वापरून हट्टी डाग अगदी सहज काढता येतात. त्यासाठी लिंबाचा रस डागांवर घाला पण ब्रशने घासा त्यानंतर पाण्यानं  स्वच्छ धुवा. या उपायाने चुटकीसरशी डाग निघून जातील.

हायड्रोडन पॅरोक्साईड

हाइड्रोजन पेरोक्साइड कोणत्याही कपड्यांवरचे डाग कायमचे हटवण्यासाठी  उत्तम पर्याय आहे. यासाठी हायड्रोजन पॅरोक्साईड आणि लिंबू घालून मिश्रण तयार करा. तयार झाल्यानंतर हे मिश्रण डाग असलेल्या ठिकाणी लावा. काहीवेळ तसेच ठेवल्यानंतर कपडा स्वच्छ पाण्यानं धुवा.
 

Web Title: How to Remove Oil Stains from Clothes : Easy Tricks to remove oil stains from clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.