Join us  

कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग निघतच नाहीत? १ सोपा उपाय- डाग कुठे पडला होता ते कळणारही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2024 6:41 PM

Oil Stain Cleaning Tips: कपड्यांवर तेलाचे डाग पडले असतील तर कमीतकमी मेहनतीत ते झटपट कसे स्वच्छ करायचे ते पाहा.. (simple and easy home hacks to get rid of oil stains from clothes)

ठळक मुद्देकपड्यांवर पडलेले तेलाचे डाग कसे काढावे, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

रोजच्या धावपळीत बऱ्याचदा असं होतं की कपड्यांवर तेलाचे डाग पडतात. ते डाग एवढे पक्के असतात की बऱ्याचदा ते कसे काढावे ते समजत नाही. वारंवार धुवूनही ते डाग निघत नाहीत. ही अडचण शाळेत जाणाऱ्या लहान मुलांच्या बाबतीत तर नेहमीच येते. शाळेत डबा खाताना ते त्यांच्या गणवेशावर हमखास डाग पाडतात (how to remove oil stains from clothes?). त्यात जर त्यांचा गणवेश पांढरा किंवा एखाद्या फिक्या रंगाचा असेल तर ते डाग खूपच उठून दिसतात. म्हणूनच आता ही एक सोपी ट्रिक पाहून घ्या आणि मुलांच्या गणवेशावरचे तसेच इतर कपड्यांवरचे तेलाचे डाग अगदी चटकन स्वच्छ करा...(simple and easy home hacks to get rid of oil stains from clothes)

 

कपड्यांवरचे तेलाचे डाग कसे काढावे?

कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग कसे काढावे, याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

मुलं ओरडून बोलतात, मोठ्या माणसांना उलट उत्तरं देतात? २ गोष्टी करा- मुलांचं वागणं बदलेल

यामध्ये त्या सांगतात की जिथे तेलाचा डाग पडला आहे, त्या भागावर खालून आणि वरतून थोडी पावडर शिंपडा. त्यानंतर त्या डागाच्या वरच्या आणि खालच्या बाजुला दोन्ही बाजुने पेपर नॅपकिन ठेवा आणि त्यावरून गरम इस्त्री फिरवा. यानंतर कपड्यावरचे बरेचसे तेल पावडर आणि पेपर नॅपकिनद्वारे शोषले गेले असेल. यानंतर नेहमीप्रमाणे तो कपडा धुवून अर्धा ते पाऊण तास उन्हात वाळत घाला. कपड्यांवरचा तेलाचा डाग पुर्णपणे निघून जाईल.

 

हा उपायही करून पाहा

कपड्यांवरचा तेलाचा डाग काढण्यासाठी सगळ्यात आधी तो भाग थोडा ओला करा. 

त्यानंतर त्यावर थोडा लिंबाचा रस टाका आणि तुमच्याकडचे कोणतेही डिटर्जंट टाका. 

नवरात्री २०२४: यंदा कोणत्या दिवशीचा कोणता रंग? पटकन बघा आणि लगेचच तयारी करून ठेवा

यानंतर साधारण ५ ते ७ मिनिटांनी त्या भागावर थोडे गरम पाणी टाका आणि कपडे घासण्याच्या ब्रशने हलकेसे घासा.

यानंतर स्वच्छ पाण्याने कपडा धुवून घेतला असता त्यावरचा तेलाचा डाग बऱ्याच प्रमाणात कमी झालेला जाणवेल. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्सहोम रेमेडी