Join us  

पणत्यांमधून गळणाऱ्या तेलामुळे फरशीवर डाग पडले? २ सोपे उपाय- डाग जाऊन फरशी होईल चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2024 1:47 PM

How To Remove Oil Stains From Floor: दिवाळीत आपण हौशीने पणत्या लावतो, पण त्याचे डाग मात्र फरशीवर दिसू लागतात. त्यासाठीच बघा हे काही साेपे उपाय....(oil leakage from panati or diya)

ठळक मुद्देबेकिंग सोडा आणि मीठ हे दोन पदार्थ वापरून फरशीवर पडलेले तेलाचे डाग खूप झटपट स्वच्छ करता येतात.

दिवाळीचा सण नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. दिवाळीनिमित्त सगळेच आपापल्या घराची खूप छान सजावट करतात. दिवाळी  म्हणजे दिपोत्सव. त्यामुळे दिवे, लाईटिंग, आकाशदिवे हे साहित्य वापरून घराची सजावट करण्यास प्राधान्य दिले जाते. घरात,  अंगणात, बाल्कनीत ठिकठिकाणी आपण पणत्या ठेवून घर सुशोभित करतो. पण लक्ष्मीपुजन, पाडवा, भाऊबीज असे तिन्ही दिवस घरात, अंगणात पणत्या लावल्यानंतर असं दिसून येतं की घरातल्या, अंगणातल्या फरशांवर तेलाचे डाग पडले आहेत आणि ते वाळून गेले आहेत. असे वाळून गेलेले तेलाचे डाग काढून टाकणं जरा अवघड जातं (oil leakage from panati or diya). म्हणूनच आता हे काही सोपे उपाय पाहा आणि कमीतकमी मेहनतीत तसेच कमीतकमी वेळात ते डा स्वच्छ करा..(how to remove oil stains from floor?)

फरशीवर पडलेले तेलाचे डाग कसे काढून टाकावे?

 

१. व्हिनेगर

पणत्यांमधून जे तेल गळतं त्यामध्ये पणतीचा थोडा रंगही मिसळला जातो. त्यामुळे चॉकलेटी, काळपट डाग फरशीवर दिसू लागतात. हे डाग काढून टाकण्यासाठी फरशीवर थोडं गरम तेल टाका.

मेकअप करुनही चेहरा खाऱ्या शेंगदाण्यासारखा दिसतो? ५ गोष्टी करा, मेकअप करुनही मिळेल नॅचरल लूक

त्यानंतर साधारण २ ते ३ मिनिटांनी त्यावर कोणतीही डिटर्जंट पावडर टाका आणि तारेच्या घासणीने ते डाग घासून काढा. डाग निघाले नाही तर त्यावर पुन्हा एकदा गरम पाणी टाका. फरशीवरचे तेलाचे डाग काढून टाकण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय आहे.

 

२. बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि मीठ हे दोन पदार्थ वापरून फरशीवर पडलेले तेलाचे डाग खूप झटपट स्वच्छ करता येतात. हा उपाय करण्यासाठी एका वाटीमध्ये १ चमचा बेकिंग सोडा आणि १ चमचा मीठ घ्या.

केस अजिबात वाढत नाहीत- खूप पातळ झाले? ७ पदार्थ रोज खा, भराभर वाढून लांबसडक होतील

त्यामध्ये एका मध्यम आकाराच्या लिंबाचा रस घाला. हे तिन्ही पदार्थ व्यवस्थित कालवून घ्या आणि ते फरशीवर जिथे तेलाचे डाग पडले आहेत त्यावर लावा. त्यानंतर एखाद्या मिनिटाने त्यावर गरम पाणी टाका आणि तारेच्या घासणीने घासा. डाग लगेचच निघून जातील. 

 

टॅग्स :स्वच्छता टिप्ससोशल व्हायरलदिवाळी 2024