'तेलकट डाग' हे अतिशय हट्टी असतात मग ते कपड्यांवर असो किंवा किचनच्या भिंतींवर. काहीवेळा स्वयंपाक करण्याच्या घाईगडबडीमध्ये आपले तेलकट हात घरातील भिंतींवर लागतात. याउलट जर घरात लहान मुलं असतील तर ती देखील जेवण जेवताना जेवणाचे तेलकट डाग भिंतींवर लावण्याची शक्यता असते. अशावेळी हे तेलकट डाग भिंत खराब न करता काढणे खूपच कठीण काम असते. काहीवेळा तर हे भिंतींवरचे डाग काढताना भिंतींवरचे महागडे पेंट देखील खराब होण्याची शक्यता असते. अशावेळी हे डाग भिंतींवरून काढण्यासाठी भिंत रगडून स्वच्छ करावी लागते किंवा भिंतीवर नवीन पेंट तरी मारावा लागतो.
खरंतर टाईल्स आणि कपड्यांवरचे तेलकट डाग काढणे एकवेळ सोपे असते, परंतु भिंतींवरचे तेलकट डाग काढणे फारच कठीण काम. ज्यांच्या स्वयंपाकघरातील भिंतींना टाइल्स नसतात, त्यांना तर हा त्रास अधिकच जाणवतो. स्वयंपाक करतांना तेल, मसाल्यांचे डाग किचनच्या भिंतींवर उडतात. असे रोज होत असल्यामुळे किचनच्या भिंतींवर त्याचा एक प्रकारचा तेलकट थर साचून राहतो. भिंतींवरचे हे तेलकट डाग व थर काढून टाकण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय पाहूयात(How to remove oil stains from kitchen walls ? 4 easy ways to remove oil from kitchen walls).
भिंतींवरचे तेलकट डाग काढून टाकण्यासाठी काही सोपे उपाय....
१. बेकिंग सोडा :- भिंतीवरील तेलाचे चिकट डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा हा एक उत्तम घरगुती उपाय आहे . यासाठी पाण्यात बेकिंग सोडा मिसळून त्याची घट्टसर पेस्ट तयार करा. त्यानंतर डाग असलेल्या भागावर ही पेस्ट लावा आणि १५ ते २० मिनिटे ही पेस्ट तशीच राहू द्यावी. नंतर स्वच्छ कपड्याने आणि पाण्याने ही भिंतीवरची पेस्ट पूर्णपणे पुसून काढून टाका. अशा प्रकारे भिंत कोरडी केल्यावर आपल्याला तेलाचा किंचितही डाग भिंतीवर दिसणार नाही.
पावसाळ्यात घरात सतत येणारा कुबट वास घालवण्यासाठी घरीच बनवा नैसर्गिक एअर फ्रेशनर...
२. लिक्विड डिशवॉश :- भिंतीवरील तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी सगळ्यात स्वस्त उपाय शोधत असाल, तर लिक्विड डिशवॉश हा एक उत्तम पर्याय आहे. लिक्विड डिशवॉश थेट डागांवर लावा आणि धुण्यापूर्वी तासभर तसेच भिंतीवर राहू द्यावे. अधिक चांगल्या परिणामांसाठी, आपण गरम पाण्यात मिसळलेले लिक्विड डिशवॉश देखील वापरू शकता. सगळ्यांत शेवटी एक स्वच्छ कापड घेऊन ते पाण्यांत भिजवून भिंतीवरचे लिक्विड डिशवॉश पुसून घ्यावे.
फ्रिजरमध्ये खूप बर्फ साचतो, फ्रिजमधून पाणी गळू लागते ? ७ सोपे उपाय, कुलिंगही होईल चांगले...
३. व्हिनेगर :- स्वयंपाक करताना वापरल्या जाणार्या व्हिनेगरमुळे साफसफाई करणे खूप सोपे होते. त्याच्या मदतीने, आपण काही मिनिटांत दुर्गंधी किंवा तेलकट डाग यांसारख्या सर्वात हट्टी डागांपासून सुटका होऊ शकता. अशावेळी भिंतीवरील तेलाचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात घेऊन, त्यानंतर स्पंज किंवा कापडाने तेलाच्या डागावर लावा. १० ते १५ मिनिटे ते असेच ठेवल्यानंतर, ओल्या कापडाने पूर्णपणे पुसून टाका.
पावसाळ्यात घराचे खिडक्या - दरवाजे फुगून झाले आहेत जाम ? ६ सोपे घरगुती उपाय...
४. हेअर ड्रायरचा वापर :- भिंतीवर जर खूपच तेलाचे डाग पडले असतील तर ते स्वच्छ करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करावा. सर्वप्रथम या डागांवर एक पातळ कागद दाबून ठेवा. त्यानंतर गरम इस्त्री किंवा हेअर ड्रायरच्या सहाय्याने तो कागद व्यवस्थित गरम करुन घ्यावा. असे केल्याने सर्व साचलेले चिकट तेल वितळेल आणि बाहेर येईल. त्यानंतर वर नमूद केलेल्या कोणत्याही एका उपायाने भिंत पूर्णपणे स्वच्छ करा.
किचन कॅबिनेट- ट्रॉल्यांची दारं तेलकट-चिकट झाली? २ सोपे उपाय, कॅबिनेट चमकेल नव्यासारखं...