Lokmat Sakhi >Social Viral > कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

Home Remedies to Remove Oil Stains on Clothes: कपड्यांवर तेलाचे डाग लागले की निघता निघत नाहीत. म्हणूनच कमी मेहनतीत डाग स्वच्छ करायचे असतील, तर करून बघा हे काही सोपे उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2023 05:28 PM2023-01-04T17:28:16+5:302023-01-04T17:28:47+5:30

Home Remedies to Remove Oil Stains on Clothes: कपड्यांवर तेलाचे डाग लागले की निघता निघत नाहीत. म्हणूनच कमी मेहनतीत डाग स्वच्छ करायचे असतील, तर करून बघा हे काही सोपे उपाय

How to remove oil stains from the clothes, 2 Home remedies to remove oil stains | कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

कपड्यावर तेलाचा डाग लागला? २ सोपे उपाय, कपडा खराब न होता डाग चटकन निघून जातील

Highlightsआपण चटकन पाणी लावून स्वच्छ केलं तर फक्त कपड्यावर सांडलेला पदार्थ निघून जातो. पण तेलाचे डाग मात्र निघता निघत नाहीत.

धावपळीत किंवा कधी लक्ष नसताना चुकून कपड्यांवर काहीतरी अन्नपदार्थ सांडतात आणि मग त्याचे डाग कपड्यावर पडतात. आपण चटकन पाणी लावून स्वच्छ केलं तर फक्त कपड्यावर सांडलेला पदार्थ निघून जातो. पण तेलाचे डाग मात्र निघता निघत नाहीत. शाळेत डबा खाताना तर लहान मुलांच्या युनिफॉर्मवर, नॅपकीनवर नेहमीच काही ना काही सांडतं आणि त्याचे डाग पडतात. असे तेलाचे डाग (how to clean oil stains on clothes) स्वच्छ करण्यासाठी हे काही सोपे उपाय (Home remedies) करून बघा. 

कपड्यांवर पडलेले तेलाचे डाग स्वच्छ करण्यासाठी उपाय
१. डिशवॉश आणि बेकिंग सोडा

डिशवॉश आणि सोडा वापरून कपड्यांवरचे तेलाचे डाग कमी मेहनतीत स्वच्छ होतात. हा उपाय इन्स्टाग्रामच्या sddecor या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

तब्येतीनुसार कशी करायची कुर्त्यांची निवड? कोणत्या प्रकारच्या कुर्तीमध्ये दिसाल अधिक आकर्षक? बघा ४ टिप्स

हा उपाय करण्यासाठी तेलाचा डाग जिथे पडला आहे, त्याच्यावर थोडे लिक्विड डिश वॉश टाका. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा टाका आणि १० ते १५ मिनिटांसाठी कपडा तसाच राहू द्या. त्यानंतर ब्रशने त्या जागेवर घासून काढा आणि नंतर नेहमीप्रमाणे तो कपडा धुवून टाका. तेलाचा डाग निघून जाईल.

 

२. बेबी पावडर
बेबी पावडरचा वापर करूनही कपड्यांवरील तेलाचे डाग काढता येतात. हा उपायही अगदी सोपा आहे. हा उपाय करण्यासाठी जिथे डाग पडला आहे, त्यावर लगेचच बेबी पावडर शिंपडा.

साबण, डिशवॉश न वापरताही भांडी होतील चकाचक, बघा भांडी घासण्याच्या ६ खास टिप्स

१५ ते २० मिनिटांसाठी कपडा तसाच राहू द्या आणि त्यानंतर त्या जागेवर थोडं साबण लावून ब्रशने घासून काढा. बेबी पावडरच्या ऐवजी कोणतीही टाल्कम पावडर वापरली तरी चालेल. 

 

Web Title: How to remove oil stains from the clothes, 2 Home remedies to remove oil stains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.