Lokmat Sakhi >Social Viral > लाकडी ड्रेसिंग टेबल, फर्निचरवर पडलेत तेलाचे डाग ? ५ सोप्या टिप्स, फर्निचरवरील तेलकट डाग होतील नाहीसे...

लाकडी ड्रेसिंग टेबल, फर्निचरवर पडलेत तेलाचे डाग ? ५ सोप्या टिप्स, फर्निचरवरील तेलकट डाग होतील नाहीसे...

How to Remove Oil Stains from Wooden Furniture : घरातील लकडी फर्निचरवरील तेलाचे डाग काढणे आता झाले सोपे... लाकडी फर्निचर खराब न होता टिकेल वर्षानुवर्ष...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2023 12:22 PM2023-09-23T12:22:19+5:302023-09-23T12:46:03+5:30

How to Remove Oil Stains from Wooden Furniture : घरातील लकडी फर्निचरवरील तेलाचे डाग काढणे आता झाले सोपे... लाकडी फर्निचर खराब न होता टिकेल वर्षानुवर्ष...

How to remove oil stains from wooden furniture, How to Remove Oil Stains From a Wood Table | लाकडी ड्रेसिंग टेबल, फर्निचरवर पडलेत तेलाचे डाग ? ५ सोप्या टिप्स, फर्निचरवरील तेलकट डाग होतील नाहीसे...

लाकडी ड्रेसिंग टेबल, फर्निचरवर पडलेत तेलाचे डाग ? ५ सोप्या टिप्स, फर्निचरवरील तेलकट डाग होतील नाहीसे...

आपल्या घराला शोभा देणारे असे अँटिक लाकडी फर्निचर आजकाल सगळ्यांच्याच घरात असते. लाकडी फर्निचर जितके दिसायला सुंदर व आकर्षक दिसते तितकेच त्यांची काळजी देखील घ्यावी लागते. या लाकडी फर्निचरची (How to Remove Oil Stains From Wood Floors and Furniture) काळजी न घेतल्यास ते खराब होऊ लागते. त्यामुळे त्यांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ज्याप्रमाणे आपण रोज घर स्वच्छ करतो, त्याचप्रमाणे लाकडी फर्निचरही रोज स्वच्छ करणे आवश्यक असते. काहीवेळा या लाकडी फर्निचरवर काही सांडून त्याचे हट्टी डाग तसेच राहतात तर काहीवेळा तेल, पाणी लागून या फर्निचरवर बुरशी चढते. यामुळे घरातील लाकडी फर्निचर खराब होऊ शकते(How to Remove Oily Stain on Wooden Furniture).

घरातील लाकडी ड्रेसिंग टेबल, डायनिंग टेबल, शेल्फ, कपाट यांवर बुरशी लागून ती खराब होऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली पाहिजे. जर या लाकडी फर्निचरवर तेलाचे डाग राहिले तर ते अस्वच्छ दिसते. याचबरोबर ते डाग (How to Remove Oil Stains From My Wooden Table) घालवण्यासाठी आपण अनेकदा खूप उपाय करून बघतो. परंतु अशा परिस्थितीत, डाग घालवताना काहीवेळा आपले फर्निचर (BEST WAYS YOU CAN REMOVE OIL STAINS FROM WOODEN FURNITURE) देखील खराब होऊ शकते. असे होऊ नये म्हणून लाकडी फर्निचरवरील तेलाचे हट्टी व चिकट डाग घालवण्यासाठी काही साधे - सोपे उपाय लक्षात ठेवूयात(How to Remove Oil Stains From a Wood Table).

लाकडी फर्निचरवरील तेलाचे डाग काढण्यासाठी सोपे उपाय.... 

१. डिशवॉश लिक्विड सोप :- डिशवॉश लिक्विड सोपच्या मदतीने आपण लाकडी फर्निचरवरील तेलाचे हट्टी डाग अतिशय सहजरीत्या काढू शकता. यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये गरम पाणी घेऊन त्यात सौम्य डिशवॉश लिक्विड सोप २ ते ३ टेबलस्पून घालून घ्यावे. डिशवॉश लिक्विड सोप व गरम पाणी यांचे द्रावण बनवून घ्यावे. आता स्पंजच्या मदतीने हे द्रावण हट्टी डागांवर लावून घ्यावे. स्पंजच्या मदतीने फर्निचर स्वच्छ करून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ पाण्यात एक कापड बुडवून ते ओले करुन घ्यावे व त्याने फर्निचर पुसून स्वच्छ करावे. 

डबे - बरण्यांचा लोणची - मसाल्यांचा वास जात नाही ? १ सोपी ट्रिक - वास जाईल पटकन...

२. व्हिनेगरचा असा करा वापर :- एका बाऊलमध्ये कोमट पाणी व व्हिनेगर सम प्रमाणात घेऊन त्यांचे एकत्रित मिसळून द्रावण तयार करुन घ्यावे. हे द्रावण तेलकट डागांवर ओतून काहीकाळ तसेच ठेवून द्यावे. १० ते १५ मिनिटानंतर स्पंजच्या मदतीने हलकेच रगडून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ कापडाने फर्निचर पुसून घ्यावे. 

कुकरची शिटी स्वच्छ कशी करायची ? काचेच्या बाटलीवरचे स्टिकर कसे काढायचे ? घ्या एकदम सोपे झटपट उपाय...

३. टॅल्कम पावडर व पेपर टॉवेल :- पेपर टॉवेल हे तेल शोषून घेण्यास अधिक फायदेशीर ठरते. यासाठी लाकडी फर्निचरवर जिथे तेलाचे डाग पडले आहेत त्या डागांवर आधी टॅल्कम पावडर घालून घ्यावी. त्यानंतर ती पावडर १० ते १५ मिनिटे तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर डागांवरील ही पावडर हलकेच रगडून काढून घ्यावी. आता जिथे तेलाचा डाग पडला आहे त्या भागावर एक स्वच्छ सुती कापड ठेवून मग त्यावर इस्त्री फिरवून घ्यावी. या सोप्या उपायामुळे आपण लाकडी फर्निचरवरील तेलाचे डाग अतिशय सहजरीत्या काढू शकतो. 

किचनमधली वेळखाऊ कामे होतील सोपी, ३ ट्रिक्स - कामे आटोपतील भरभर, टेंशन कमी...

मिक्सर न वापरता करा हिरवीगार इन्स्टंट हिरवी चटणी, एक आयडिया भन्नाट मिनिटांत चटणी रेडी...
 

लाकडी फर्निचवरील तेलाचे हट्टी डाग काढण्यासाठी इतर उपाय :- 

१. लाकडी फर्निचरवरील तेलकट डागांवर थोडेशी पेट्रोलियम जेली लावून देखील आपण हे डाग काढू शकतो. 

२. लाकडी फर्निचरजवळ तेलाच्या बाटल्या ठेवू नका. जर तेलाच्या बाटल्या ठेवत असाल तर त्याच्या खाली कापड किंवा पुठ्ठा ठेवा. यामुळे फर्निचरवर तेलाचे डाग पडणार नाहीत. 

३. टॅल्कम पावडर ऐवजी आपण बेकिंग सोडा किंवा कॉर्नस्टार्च देखील वापरु शकता. 

४. लाकडी फर्निचरवरील तेलाचे डाग घालवण्यासाठी मीठ, पाणी आणि लिंबाचा रस यांची एकत्रित पेस्ट बनवा आणि डागांवर स्प्रे करुन स्वच्छ सुती कापडाने पुसून घ्यावे. 

५. तेलाचे डाग काढून टाकल्यानंतर लाकडी फर्निचर काहीकाळ सूर्यप्रकाशात ठेवावे, जेणेकरून लाकूड ओलाव्यामुळे खराब होणार नाही. फर्निचर सुकविण्यासाठी आपण ब्लो ड्रायरचा देखील वापर करु शकता.

Web Title: How to remove oil stains from wooden furniture, How to Remove Oil Stains From a Wood Table

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.