बरेच मुलं शाळेत प्लास्टिकचा डबा नेतात. प्लास्टिकचा डबा वापरणे खरे तर टाळायला हवे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. पण तरीही बरेच पालक मुलांना प्लास्टिकचे डबे देतात. प्लास्टिक जर चांगल्या प्रतीचे आणि बीपीए फ्री असेल तर ते वापरण्यास हरकत नाही. पण काही दिवस जर प्लास्टिकचे डबे तुम्ही सतत वापरले तर त्यांना तेलकट, कुबट वास येतो (how to clean yellow stains on plastic lunch box?). त्यांच्यामध्ये एक प्रकारचा चिकटपणा जाणवतो. डब्यांच्या झाकणांना असलेल्या रबरलाही चिकटपणा जाणवतो. तो कमी करण्यासाठी हे काही उपाय करून बघा... (how to remove oily smell from tiffin?)
प्लास्टिकच्या डब्यांचा चिकटपणा- तेलकटपणा घालविण्यासाठी उपाय
१. गरम पाणी
प्लास्टिकचे डबे आठवड्यातून एकदा गरम पाण्याने स्वच्छ करा आणि स्वच्छ केल्यानंतर ते लगेच पुसून कोरडे करा.
जोर लावूनही पोट साफ होतच नाही? ३ पद्धतींनी शरीराची हालचाल करा- पोट लगेचच मोकळं होईल
काही तासांसाठी झाकण न लावता तसेच उघडे ठेवा. यामुळे डब्यांमधून येणारा तेलकट वास नक्कीच कमी होईल.
२. लिंबू आणि मीठ
दुसरा उपाय म्हणजे दर दोन-तीन दिवसांतून एकदा प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम पाणी टाका. त्यात थोडा लिंबाचा रस आणि थोडे मीठ घाला.
सारखं डोकं दुखतं- काय करावं सुचत नाही? बघा सोपे व्यायाम, दुखणाऱ्या डोक्याला मिळेल आराम..
काही मिनिटांसाठी ते पाणी तसेच डब्यात राहू द्या आणि नंतर लिंबाच्या सालीने तो डब्बा पूर्णपणे घासून काढा. त्यानंतर गरम पाण्याने डबा व्यवस्थित विसळून घ्या. डिशवॉश लावून घासून घ्या आणि लगेचच स्वच्छ कोरडा करून काही तास उघडा ठेवा. डबा खूप स्वच्छ होईल.
३. बेकिंग सोडा
हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडा बेकिंग सोडा लागणार आहे. बेकिंग सोड्याचा वापर करूनही डब्यांचा चिकटपणा तसेच त्यांना येणारा कुबट वास काढता येतो.
माहूर गडावर मिळतो तसा तांबूल घरी करायचा? बघा सोपी रेसिपी, १० मिनिटांत तांबूल तयार..
हा उपाय करण्यासाठी डबा थोडासा ओलसर करा. त्यात काही मिनिटांसाठी बेकिंग सोडा टाकून ठेवा आणि नंतर डिशवॉश लिक्विड वापरून तो डबा घासून काढा डब्याचा चिकटपणा तसेच त्याला येणारा तेलकट, कुबट वास जाईल